जमुई : महिलांच्या शरिरात हार्मोन्सची प्रचंड उलथापालथ होत असते. हार्मोन्सवरच केसांचं, त्वचेचं आणि संपूर्ण शरिराचं सौंदर्य अवलंबून असतं. अगदी वयात येताना, तारुण्यात, विवाहानंतर, आई झाल्यावर, अशा वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर हार्मोन्सची पातळी वर-खाली होते. त्यामुळे वेळोवेळी स्त्रीरोग तज्ज्ञांचा सल्ला घेऊन आपल्या शरिरातील हार्मोन्स सुस्थितीत आहेत ना, याची खात्री करून घ्यावी. आयुर्वेदात यावर अनेक घरगुती उपायदेखील सांगितलेले आहेत. त्यातीलच एक सोपा उपाय म्हणजे लवंग. होय, किचनमध्ये आढळणारा हा लहानसा पदार्थ मुलींपासून महिलांपर्यंत सर्वांसाठी रामबाण असतो.
advertisement
आई होणं हे जवळपास प्रत्येक स्त्रीचं स्वप्न असतं. स्वतः बाळाला जन्म द्यायचा असेल, तर आरोग्याची व्यवस्थित काळजी घ्यावी लागते. कारण सध्याच्या धावपळीच्या, धकाधकीच्या जीवनात आरोग्यावर अनेक विपरीत परिणाम होतात. गर्भधारणेतदेखील अडचणी येतात. शिवाय महिलांना मासिकपाळीदरम्यानही त्रास सहन करावा लागतो. अनेकजणींना वेळेत पाळी येत नाही, अनेकजणींना अवेळी पाळी येते. या सर्व समस्यांवर आज आपण सोपे उपाय पाहणार आहोत.
काजू कितीही असले पौष्टिक तरी ठरतात घातक, 'असे' खाल्ले तर जडतील किडनी, फुप्फुस आणि हृदय रोग!
लवंगाच्या पाण्याने होईल अडचण दूर
डॉक्टर रास बिहारी तिवारी सांगतात, लवंग हे उत्तम अँटीऑक्सिडंट आहे, त्यामुळे शरिराची रोगप्रतिकारक शक्ती उत्तम होते. महिलांनी दररोज सकाळी उपाशीपोटी आणि रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास लवंगाचं पाणी प्यायल्यास फायदा होतो. या पाण्यामुळे मासिकपाळी नियमित होते. ज्यांना पाळीबाबत अडचण असेल त्यांनी लवंगाच्या पाण्याचं नियमित सेवन करावं.
इतकंच नाही, तर लवंगामुळे गर्भधारणेची शक्यताही वाढते. आपण लवंग घातलेलं दूधही पिऊ शकता. परंतु लक्षात घ्या, जास्त प्रमाणात लवंग खाऊ नये. त्यामुळे तोंडात जळजळ होऊ शकते. दातदुखीदेखील उद्भव्यू शकते.
'असं' बनवा लवंगाचं पाणी
डॉक्टरांनी सांगितलं की, एका काचेच्या ग्लासात उकळलेलं पाणी घ्या. त्यात जवळपास अर्धी मूठ लवंग घाला. लवंग रात्रभर भिजायला हवे. दुसऱ्या दिवशी ते छान शिजवून घ्या. गरज असल्यास त्यात आणखी पाणी घाला. 15 मिनिटं उकळल्यानंतर पाण्याचा रंग बदलेल, मग गॅस बंद करा. पाणी थंड झाल्यानंतर गाळणीने गाळा. हे पाणी सकाळी आणि रात्री प्या.
लवंग पाण्यात शिजवायचे नसल्यास ज्या पाण्यात ते भिजवले तेच पाणी प्या. मात्र जास्त प्रमाणात पाणी पिऊ नये, त्यामुळे पोटात आग पडू शकते. पोटाचे इतरही विकार होऊ शकतात.
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.)
लेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनलला करा फॉलो...या लिंकवर क्लिक करा https://whatsapp.com/channel/0029Va7W4sJI7BeETxLN6L0g