त्वचा हायड्रेट ठेवणे खूप गरजेचे
त्वचेतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी सर्वात महत्त्वाचे आहे की तुम्ही स्वतःला आतून हायड्रेट ठेवा. दिवसभरात 8-10 ग्लास पाणी नक्की प्या. यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात आणि त्वचा हायड्रेट राहते. याशिवाय, नारळ पाणी, ताज्या फळांचे रस आणि हर्बल टी यांचा तुमच्या आहारात समावेश करा, ज्यामुळे त्वचा नैसर्गिकरित्या चमकेल.
advertisement
नारळ आणि बदाम तेलाने करा मसाज
कोरड्या त्वचेसाठी नारळ तेल आणि बदाम तेल खूप फायदेशीर असतात. आंघोळ करण्यापूर्वी 5-10 मिनिटे हलक्या गरम तेलाने चेहरा आणि शरीराची मसाज करा. यामुळे त्वचेतील ओलावा टिकून राहतो आणि त्वचा कोरडी होण्यापासून वाचते. हिवाळ्यात विशेषतः तेल मालिश केल्याने त्वचा मऊ राहते.
हलके आणि नैसर्गिक मॉइश्चरायझरचा वापरा
अनेक वेळा लोक हार्श केमिकल्स असलेले स्किन केअर प्रोडक्ट्स वापरतात, ज्यामुळे त्वचा अधिक कोरडी होते. त्यामुळे नेहमी हलके आणि नैसर्गिक मॉइश्चरायझर वापरा. कोरफड जेल, शिया बटर, ग्लिसरीन आणि दुधापासून बनलेले मॉइश्चरायझर कोरड्या त्वचेसाठी सर्वोत्तम असतात.
जास्त गरम पाण्याने आंघोळ करू नका
अनेक लोक हिवाळ्यात जास्त गरम पाण्याने आंघोळ करतात, ज्यामुळे त्वचेची नैसर्गिक तेलकट थर निघून जाते आणि त्वचा कोरडी होऊ लागते. त्यामुळे कोमट पाण्याने आंघोळ करा आणि आंघोळीनंतर लगेच बॉडी लोशन किंवा तेल लावा, जेणेकरून ओलावा टिकून राहील.
योग्य आहार घ्या
आपल्या त्वचेचे आरोग्य आपल्या खाण्यावरही अवलंबून असते. कोरड्या त्वचेपासून वाचण्यासाठी व्हिटॅमिन ई आणि ओमेगा-3 फॅटी ऍसिडयुक्त आहार घ्या. बदाम, अक्रोड, जवस, एव्होकॅडो आणि ऑलिव्ह ऑईल त्वचेला आतून ओलावा देण्यास मदत करतात.
हे ही वाचा : संवेदनशील त्वचेसाठी परफेक्ट रूटीन! सकाळी आणि रात्री काय कराल? तज्ज्ञ सांगतात...
हे ही वाचा : फक्त मॉइश्चरायझर पुरेसे नाही! त्वचा हायड्रेटेड ठेवण्यासाठी करा 'हे' खास उपाय, मिळेल नैसर्गिक ग्लो!