यामध्ये क्लींजर, टोनर, सीरम, मॉइश्चरायझर आणि लिप केअर यांसारख्या स्टेप्सचा समावेश आहे, जे तुमच्या त्वचेला पोषण देण्यासोबतच तिचा ग्लो वाढविण्यातही मदत करतात. जर तुम्हालाही डागविरहित आणि चमकणारी त्वचा हवी असेल, तर हे रूटीन नक्की फाॅलो करा.
नाईट स्किन केअर रूटीन स्टेप बाय स्टेप...
क्लींजरने करा सफाई (2 मिनिटे) : दिवसभरची धूळ, तेल आणि मेकअप काढण्यासाठी हलक्या क्लींजर किंवा मायसेलर वॉटरने चेहरा स्वच्छ करा. यामुळे तुमची त्वचा श्वास घेऊ शकेल आणि पोर्समध्ये घाण जमा होणार नाही.
advertisement
एक्सफोलिएट करा (2-3 मिनिटे) : डेड स्किन सेल्स काढण्यासाठी आणि चेहऱ्याची चमक वाढवण्यासाठी हलक्या हाताने एक्सफोलिएशन करा. ही प्रक्रिया त्वचा स्वच्छ आणि स्मूद बनवते. आठवड्यातून 2-3 वेळा एक्सफोलिएट करणे पुरेसे आहे.
टोनर लावा (1 मिनिट) : टोनरचा वापर त्वचेचे पीएच संतुलन राखण्यासाठी केला जातो. हे स्किनला हायड्रेट करते आणि पुढील स्किनकेअर प्रोडक्ट्सला चांगल्या प्रकारे शोषून घेण्यास मदत करते.
सीरमचा वापर करा (2 मिनिटे) : रात्री व्हिटॅमिन सी किंवा हायलुरोनिक ऍसिड सीरम लावा. हे त्वचेला आतून पोषण देतात आणि नमी टिकवून ठेवतात, ज्यामुळे त्वचा नैसर्गिकरित्या ग्लो करते.
मॉइश्चरायझर लावा (2 मिनिटे) : हलक्या नाईट क्रीम किंवा मॉइश्चरायझरने चेहऱ्याची हलकी मसाज करा. हे त्वचेतील ओलावा टिकवून ठेवण्यास मदत करते आणि रात्रभर दुरुस्तीचे काम करते.
आई क्रीम आणि लिप केअर (अंतिम स्टेप) : डोळ्यांखालील त्वचा नाजूक असते, म्हणून डार्क सर्कल्स आणि पफीनेस कमी करण्यासाठी आई क्रीम नक्की लावा. तसेच, ओठ कोरडे होऊ नये म्हणून लिप बाम लावायला विसरू नका.
या 10 मिनिटांच्या नाईट स्किनकेअर रूटीनचा वापर करून तुम्हीही दररोज सकाळी फ्रेश आणि ग्लोइंग त्वचा मिळवू शकता.
हे ही वाचा : Skincare Routine: तेलकट त्वचेचा त्रास होतोय? 'या' 5 सोप्या स्टेप्सने मिळवा चमकदार आणि फ्रेश त्वचा!
हे ही वाचा : आयुर्वेदिक स्किनकेअरचा नवा ट्रेंड! फाॅलो करा 'हे' 5 उपाय, मिळेल नैसर्गिक सौंदर्य आणि निरोगी त्वचा!