वजन कमी करण्यासह अनेक गोष्टींचा संकल्प नवीन वर्षाच्या मुहूर्तावर करत असाल तर इथे दिलेल्या सहा टिप्सचा नक्की विचार करा. या सकाळच्या सहा सवयी तुमच्यात सकारात्मक बदल दिसतील. पण यासाठी सवयींमधे नियमितपणा हवा.
ऑफिसमध्ये बराच वेळ एकाच जागी बसल्यानं, शारीरिक हालचाली न केल्यानं लठ्ठपणा येऊ शकतो. बरेच जण वजन कमी करण्यासाठी खूप प्रयत्न करतात, पण त्यांना त्याचे परिणाम दिसत नाहीत. वजन कमी करण्यासाठी फक्त व्यायाम करणं पुरेसं नाही, यासोबतच सकाळच्या दिनचर्येत काही बदल करणंही तितकंच आवश्यक आहे.
advertisement
Dandruff : केसांतला कोंडा घालवण्यासाठी पारंपरिक उपाय, जाणून घ्या कापराचे फायदे
प्रथिनयुक्त नाश्ता - वजन कमी करण्यासाठी मसालेदार नाश्त्याऐवजी प्रथिनयुक्त पदार्थ खा. उच्च प्रथिनयुक्त नाश्ता केल्यानं भूक कमी लागते आणि वजन कमी करण्यास मदत होते.
भरपूर पाणी प्या - वजन कमी करण्यासाठी, एक ते दोन ग्लास पाणी पिऊन सकाळची सुरुवात करा. पाणी प्यायल्यानं भूक कमी होते, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. ही माहिती हेल्थलाइनमधे देण्यात आली आहे.
वजन करा - दररोज सकाळी स्वतःचं वजन करणं हा वजन कमी करण्याचा एक उपयुक्त मार्ग आहे. यामुळे वजन कमी करण्यासाठीचा उत्साह वाढेल.
Heart Attack : महिलांमधे आढळणारी हृदयविकाराची लक्षणं, या टिप्स नक्की लक्षात ठेवा
सूर्यप्रकाश - सकाळी सूर्यप्रकाश घरात येऊ देणं किंवा काही मिनिटं उन्हात थांबणं हे वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. हेल्थलाइननुसार, मध्यम प्रमाणात प्रकाशाचा संपर्क वजनावर सकारात्मक परिणाम करू शकतो.
यामुळे शरीरातील व्हिटॅमिन डीची कमतरता भरून काढण्यास देखील मदत होते.
पुरेशी झोप घ्या - योग्य आहार आणि नियमित व्यायामाप्रमाणेच, वजन कमी करण्यासाठी झोपेचं वेळापत्रक देखील महत्त्वाचं आहे. दररोज किमान आठ तास झोप घेण्याचं ध्येय ठेवा.
व्यायाम - वजन कमी करण्यासाठी, सकाळी व्यायाम नक्की करा. पण कोणते व्यायाम करायचे यासाठी आहारतज्ज्ञांचा, प्रशिक्षकांचा सल्ला नक्की घ्या.
