Dandruff : केसांसाठी वरदान - कापूर आणि खोबरेल तेल, कापुरानं होईल केसांतला कोंडा कमी, जाणून घ्या कसा करायचा वापर
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
केसांच्या चांगल्या आरोग्यासाठी, कापुराचा वापर कसा करायचा हे मात्र लक्षात ठेवा. कारण थेट कापूर टाळूवर लावणं योग्य नाही. यासाठी कापूर तेलात मिसळून लावणं चांगलं. नारळाचं तेल आणि कापूर हा केसांसाठी चांगला उपाय आहे. जाणून घेऊया याचा वापर कसा करायचा.
मुंबई : केसांची काळजी घेण्यासाठी अनेक जण तेलाबरोबरच कापुराचा वापर करतात. ही युक्ती आताच्या थंड हवेत वापरता येऊ शकेल. कापरामुळे केसातला कोंडा कमी होतो. केसांची वाढ कमी होते.
केसांच्या चांगल्या आरोग्यासाठी, कापुराचा वापर कसा करायचा हे मात्र लक्षात ठेवा. कारण थेट कापूर टाळूवर लावणं योग्य नाही. यासाठी कापूर तेलात मिसळून लावणं चांगलं. नारळाचं तेल आणि कापूर हा केसांसाठी चांगला उपाय आहे. जाणून घेऊया याचा वापर कसा करायचा.
केसांच्या वाढीसाठी हे तेल उपयुक्त आहे. हे तेल बनवण्यासाठी शंभर ग्रॅम कापुराचे तुकडे, नारळाचं तेल हे साहित्य आवश्यक आहे. यासाठी दहा ग्रॅम भीमसेनी कापूर घ्या आणि शंभर ग्रॅम शुद्ध नारळ तेलात मिसळा. हे मिश्रण सूर्यप्रकाशात ठेवा.
advertisement
या तेलानं केसांना मसाज करा. यामुळे केसातला कोंडा, केस कोरडे होणं अशा त्वचेच्या अनेक समस्यांपासून आराम मिळेल. कापुरात अँटीफंगल आणि थंड गुणधर्म असतात, ज्यामुळे केसांची चांगली वाढ होते. यामुळे टाळूतलं रक्ताभिसरण देखील सुधारत, ज्यामुळे केस मजबूत होतात आणि केस गळण आणि कोंडा यासारख्या समस्या दूर होतात.
advertisement
दरम्यान, नारळाच्या तेलात फॅटी अॅसिड, जीवनसत्त्वं आणि बुरशीविरोधी गुणधर्म असतात. यामुळे संसर्ग होण्याचं प्रमाण कमी होतं. फॅटी अॅसिड केसांच्या मुळांपर्यंत पोहोचतं, ज्यामुळे ओलावा मिळतो आणि कोंड्यासारख्या समस्या दूर होतात.
केसातील कोंडा घालवण्यासाठी, केसांना कोरफडीचा ताजा गर लावू शकता. गर टाळूवर लावून अर्धा तास ठेवा आणि नंतर केस धुवा. हे नियमितपणे केल्यानं मदत होईल.
advertisement
कोरफडीतले अँटीबॅक्टेरियल आणि अँटी-फंगल गुणधर्मांमुळे टाळू स्वच्छ राहतो. ज्यामुळे केसांच्या समस्या दूर करण्यास मदत होते.
कडुनिंबाच्या पानांची पेस्ट टाळूवर लावल्यानं कोंडा कमी व्हायला मदत होते. या पानांमधे अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म असतात. यामुळे कोंडा होण्याचं, खाज सुटण्याचं आणि केस गळण्याचं प्रमाण कमी होतं.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 16, 2025 12:52 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Dandruff : केसांसाठी वरदान - कापूर आणि खोबरेल तेल, कापुरानं होईल केसांतला कोंडा कमी, जाणून घ्या कसा करायचा वापर