कोणत्याही दुष्परिणामांशिवाय वजन कमी करण्यास मदत करणारी घरगुती, नैसर्गिक पद्धतीबद्दल जाणून घेऊया. यासाठी डॉ. सलीम झैदी यांनी घरी बनवता येईल असं वेट लॉस ड्रिंक सुचवलं आहे. यामुळे चयापचय गतिमान राहतं आणि शरीरातील चरबी कमी व्हायला मदत होते.
Morning Tips : एक तास नाही केवळ दहा मिनिटांचा व्यायाम करा, वाचा मॉर्निंग टिप्स
advertisement
वजन कमी करण्यासाठी चयापचय प्रक्रिया चांगली असणं अत्यंत महत्त्वाची आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, चयापचय जितकं चांगलं असेल तितक्या लवकर शरीर कॅलरीज बर्न करेल. कमी चयापचयामुळे कमी खाल्ल्यानंतरही अनेकांना वजन कमी करण्यास त्रास होतो.
वेट लॉस ड्रिंक बनवण्यासाठी, लवंग, दालचिनी आणि जिरं आवश्यक आहे. हे तिन्ही घटक स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असतात.
लवंग - लवंगेमुळे शरीरात साठलेली अतिरिक्त चरबी हळूहळू कमी करण्यास मदत होते. पोटाची चरबी कमी करण्यासाठी लवंग प्रभावी आहे. यामुळे पचन सुधारतं आणि उर्जेची पातळी राखली जाते.
दालचिनी - दालचिनीमुळे रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रित करण्यास मदत होते. वारंवार भूक लागण्यापासून रोखलं जातं. यामुळे चयापचय वेग वाढतो आणि जास्त खाण्याची इच्छा कमी होते.
जिरं - पचनासाठी जिरं खूप फायदेशीर आहे. योग्य पचन करण्यासाठी जिरं उपयुक्त आहे, कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहण्यासाठी जिरं फायदेशीर आहे.
Winter Care : छोटीशी गोळी घेईल घशाची काळजी, घसादुखीवर या उपायानं करा मात
पेय बनवण्याची सोपी पद्धत -
- लवंगा, दालचिनी आणि जिरं समान प्रमाणात घ्या.
- बारीक पावडर करा आणि स्वच्छ, कोरड्या डब्यात ठेवा.
- दररोज सकाळी, एक ग्लास पाण्यात एक चमचा पावडर घाला आणि ते पाच-सात मिनिटं उकळवा.
- पाणी थोडं कमी झाल्यावर ते गाळून घ्या आणि कोमट होऊ द्या.
- या पाण्यात एक चमचा मध घाला. हे पेय पिऊ शकता.
सकाळी रिकाम्या पोटी हे पेय पिणं चांगलं. डॉ. सलीम यांच्या मते, दहा ते चौदा दिवसांत या पेयाचं नियमित सेवन केल्यानं हलकं वाटेल, भूक नियंत्रित होईल आणि पोटातील, कंबरेच्या आणि कंबरेवरील चरबी हळूहळू कमी होईल.
हे पेय म्हणजे कायमस्वरुपी औषध नाही. यासोबत जीवनशैलीकडे थोडं लक्ष दिलं तर त्याचे परिणाम आणखी वेगानं होऊ शकतात. थोडं चालणं किंवा व्यायाम करणं, साखरेचे आणि तळलेले पदार्थ कमी करणं आणि प्रथिनयुक्त पदार्थ खाणं यामुळे लवकर परिणाम दिसू शकतात.
