स्क्रीन टाइमचा मागोवा घ्या
अनेक लोकांना हे माहित नसतं की, ते दिवसातून किती तास फोन वापरतात. जर तुम्हालाही वारंवार फोन चेक करण्याची सवय असेल, तर आधी तुमचा स्क्रीन टाइम ट्रॅक करा. बहुतेक स्मार्टफोनमध्ये डिजिटल वेलबीइंग किंवा स्क्रीन टाइम हे फीचर असतं, ज्याद्वारे तुम्ही कोणत्या ॲपवर किती वेळ घालवला हे पाहू शकता. हा डेटा पाहिल्यानंतर, तुम्ही तुमचा फोन वापरण्याची सवय कमी करू शकता.
advertisement
नोटिफिकेशन्स बंद करा
फोनवरून येणाऱ्या वारंवार नोटिफिकेशन्स तुम्हाला विचलित करू शकतात आणि तुमचं लक्ष दुसरीकडे वळवू शकतात. सोशल मीडिया, ईमेल आणि इतर ॲप्सच्या अनावश्यक नोटिफिकेशन्स बंद करा, जेणेकरून तुमचं लक्ष काही मिनिटांनंतर फोनकडे जाणार नाही. फक्त कॉल्स आणि मेसेजेससारख्या महत्त्वाच्या नोटिफिकेशन्स चालू ठेवा.
नो-फोन झोन तयार करा
तुमच्या घरात किंवा ऑफिसमध्ये काही जागा निश्चित करा जिथे फोन वापरला जात नाही, जसे की जेवणाचं टेबल, बेडरूम किंवा कामाची जागा. यामुळे तुम्हाला कुटुंबासोबत वेळ घालवता येईल आणि रात्री झोपण्यापूर्वी फोन चेक करण्याची सवयही कमी होईल.
सोशल मीडिया आणि गेमिंगसाठी वेळ मर्यादा सेट करा
बरेच लोक सोशल मीडिया स्क्रोल करण्यात किंवा गेमिंगमध्ये तासन्तास वाया घालवतात. यासाठी, फोनमधील ॲप टाइमर फीचरचा वापर करा, ज्यामुळे तुम्ही ठराविक वेळेसाठीच एखादं ॲप वापरू शकाल. उदाहरणार्थ, दिवसातून फक्त 30 मिनिटेच इंस्टाग्राम किंवा फेसबुक वापरण्याची मर्यादा सेट करा.
वास्तविक जीवनातील गोष्टींमध्ये आवड वाढवा
फोनवरून लक्ष हटवण्यासाठी, तुम्ही वास्तविक जगात आवड निर्माण करणं महत्त्वाचं आहे. पुस्तकं वाचा, संगीत ऐका, व्यायाम करा, मित्र आणि कुटुंबासोबत वेळ घालवा किंवा नवीन कौशल्य शिका. जेव्हा तुम्ही व्यस्त असाल, तेव्हा तुमचं फोनचं व्यसन आपोआप कमी होईल.
हे ही वाचा : Amla : लांब आणि दाट केसांसाठी करा नैसर्गिक उपाय, आवळ्यांची युक्ती येईल कामी
हे ही वाचा : चपाती की भात, हेल्थी राहण्यासाठी काय खावं जास्त? कशातून मिळते सर्वाधिक ऊर्जा?
