चपाती की भात, हेल्थी राहण्यासाठी काय खावं जास्त? कशातून मिळते सर्वाधिक ऊर्जा?
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
Healthy Diet: वजन कमी करण्यासाठी नक्की भात खावा की चपाती खावी याबाबत अनेकजणांच्या मनात गोंधळ असतो. नक्की कशातून जास्त पोषक तत्त्व आणि ऊर्जा मिळते जाणून घेऊया.
अरुण कुमार गोस्वामी, प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारतीय जेवणात भात आणि चपाती हे 2 पदार्थ प्रामुख्यानं असतात. परंतु वजन कमी करण्यासाठी नक्की भात खावा की चपाती खावी याबाबत अनेकजणांच्या मनात गोंधळ असतो. नक्की कशातून जास्त पोषक तत्त्व आणि ऊर्जा मिळते जाणून घेऊया.
भातात कॅल्शियम आणि पोटॅशियमचं प्रमाण कमी असतं. पांढऱ्या तांदळांमध्ये फायबरही कमी असतं. त्यामुळे त्याचं पचन लवकर होतं आणि लगेच पुढची भूक लागते. दरम्यान, भात व्हिटॅमिन बीने परिपूर्ण असतो. ज्यामुळे शरीराची पचनक्रिया उत्तम राहते. तर, चपाती हळूहळू पचते. त्यामुळेदेखील पचनसंस्था सुरळीत राहते आणि बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही.
advertisement
भातामध्ये कार्बोहायड्रेट जास्त असतं. त्यामुळे अति भात खाल्ल्यास वजन वाढू शकतं. तसंच यामुळे रक्तातली साखरही वेगानं वाढू शकते. जर आपल्याला वजन कमी करायचं असेल, तर चपाती खाणं जास्त फायद्याचं ठरतं. चपातीत जास्त फायबर आणि प्रोटीन असतं. त्यामुळे पोट जास्तवेळ भरलेलं राहतं आणि मेटाबॉलिज्म वाढतं.
चपातीमध्ये फायबर भरपूर असल्यानं ती भरपूर खावीशी वाटत नाही. तसंच भाताच्या तुलनेत चपातीत ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्यानं रक्तातली साखर वेगानं वाढत नाही. चपातीत आयर्न, कॅल्शियम, पोटॅशियम, फॉस्फोरस, मॅग्नेशियम आणि फायबर भरपूर असतं. यातील ग्लूटेन आणि प्रोटीनमुळे शरीरातील पेशी भक्कम होण्यास मदत मिळते. धनबाद भागातील डॉक्टर रमेश यांनी ही सविस्तर माहिती दिली आहे.
advertisement
सूचना : इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. तरी आपण आपल्या आरोग्याबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी स्वतः डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कोणत्याही नुकसानासाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.
Location :
New Delhi,Delhi
First Published :
January 31, 2025 4:40 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
चपाती की भात, हेल्थी राहण्यासाठी काय खावं जास्त? कशातून मिळते सर्वाधिक ऊर्जा?