नवी दिल्ली : आजकाल प्रदूषण प्रचंड वाढलंय. त्यात धावपळीच्या दिनक्रमात आपल्याकडे स्वतःची काळजी घेण्यासाठीच पुरेसा वेळ नसतो. तरीही विविध केमिकलयुक्त साबण, शॅम्पू आपण वापरतो. ज्यामुळे त्वचेचे, केसांचे हालच होतात. मग लक्षात येतं की, पूर्वी आपण आपल्या केसांसाठी, त्वचेसाठी जे पदार्थ वापरायचो, तेच अत्यंत फायद्याचे होते, जसं की नारळाचं तेल.
तुम्हाला माहितीये का, कोमट पाण्यात लिंबाचा रस घालून प्यायल्यास संपूर्ण शरीर डिटॉक्स होण्यास मदत मिळते. तसंच जर नारळाच्या तेलात लिंबाचा रस घातल्यास त्यापासून शरीराला काय फायदे मिळतात, हेच आज आपण जाणून घेणार आहोत. डॉ. ज्योती चौहान यांनी याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी सांगितलं की, नारळाचं तेल आणि लिंबात विविध पोषक तत्त्व भरभरून असतात जे केस आणि त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर ठरतात.
advertisement
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, नारळाच्या तेलात लिंबाचा रस मिसळून लावल्यास केसातील कोंडा कमी होऊ शकतो. कारण त्यात असलेल्या अँटी-बॅक्टेरियल, अँटी-फंगल गुणधर्मांमुळे स्कॅल्प स्वच्छ राहतो. जर केसगळती वाढली असेल तर, नारळाच्या तेलात लिंबू मिसळून केसांवर लावण्याचा सल्ला दिला जातो. त्यात व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई आणि फॅटी ऍसिड असतं, ज्यामुळे केस मजबूत होतात आणि नवीन केसांची वाढ होण्यास मदत मिळते.
नारळाचं तेल आणि लिंबाचं फेस पॅक त्वचेसाठी अतिशय उपयुक्त मानलं जातं. चेहऱ्यावर भरपूर डाग झाले असतील, तर ते यामुळे जाऊ शकतात, तसंच चेहरा छान उजळू शकतो. या तेलामुळे त्वचेवरील सुरकुत्या कमी होण्यासही मदत मिळू शकते, नारळाचं तेल एक उत्तम मॉइश्चराइजर म्हणून उपयुक्त ठरतं, ज्यामुळे स्किन हायड्रेटेड राहते. तसंच लिंबामुळे त्वचेत कॉलेजन वाढतं.
