दुधामध्ये उत्कृष्ट पोषक घटक असतातच, त्यात बदामाची पावडर टाकून पिण्यानं उपयुक्तता आणखी वाढते. बदामामध्ये जीवनसत्व, खनिजं, तंतूमयता आणि हेल्दी फॅट्स मुबलक प्रमाणात आढळतात, जे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत.
बदामाची पावडर दुधात मिसळून प्यायल्याने चव तर वाढतेच, पण त्याचा आपल्या शरीराला अनेक प्रकारे फायदा होतो. हाडांची घनता आणि आरोग्य चांगलं राखण्यासाठी ही माहिती महत्त्वाची आहे.
advertisement
Fat Loss Tips : पोटाचा घेर कमी करायचाय ? आधी या चुका टाळा, मग करा डाएट प्लान
बदाम पावडर मिसळून दूध पिण्याचे फायदे
1. हाडांची मजबुती
बदामामध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम मुबलक प्रमाणात आढळतं, हे दोन्ही घटक हाडांना मजबूत करण्यासाठी खूप महत्वाचे आहेत. बदामाची पावडर दुधात मिसळून प्यायल्यानं हाडांची घनता वाढते आणि हाडांच्या आजारांचा धोका कमी होतो.
2. मेंदूसाठी फायदेशीर
व्हिटॅमिन ई आणि ओमेगा -3 फॅटी ऍसिड बदामामध्ये आढळतात, जे आपल्या मेंदूसाठी खूप फायदेशीर आहेत. बदाम पावडर दुधात मिसळून प्यायल्यानं स्मरणशक्ती वाढते आणि एकाग्रता वाढते.
3. हृदयाच्या आरोग्यासाठी उपयुक्त
बदामामध्ये मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स आढळतात, जे आपल्या हृदयाच्या आरोग्यासाठी खूप चांगले असतात. बदामाची पावडर दुधात मिसळून प्यायल्यानं कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो.
Diet Tips: अशक्तपणा दूर करण्यासाठी डाएट टिप्स, आहारात बदल केल्यानं राहाल फिट, वजनही वाढेल
4. वजन कमी करण्यासाठी फायदेशीर
बदामामध्ये फायबर आणि प्रथिनं मुबलक प्रमाणात आढळतात, ज्यामुळे आपल्याला दीर्घकाळ पोट भरल्यासारखं वाटतं. बदाम पावडर दुधात मिसळून प्यायल्यानं भूक कमी होते आणि वजन कमी होण्यास मदत होते.
5. त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर
बदामामध्ये व्हिटॅमिन ई आणि अँटिऑक्सिडंट्स आढळतात. हे दोन्ही घटक आपल्या त्वचेसाठी आणि केसांसाठी खूप फायदेशीर असतात. बदामाची पावडर दुधात मिसळून प्यायल्यानं त्वचा चमकदार होते आणि केस गळणं कमी होते.
6. प्रतिकारशक्तीसाठी उपयुक्त
बदामामध्ये व्हिटॅमिन सी म्हणजेच जीवनसत्व क आणि झिंक (जस्त) आढळतं. यामुळे आपली प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. बदामाची पावडर दुधात मिसळून प्यायल्यानं आपलं शरीर रोगांशी लढण्यास सक्षम होते.
बदाम पावडर दुधात मिसळून पिण्याची उत्तम वेळ म्हणजे सकाळी रिकाम्या पोटी किंवा रात्री झोपण्यापूर्वी. एक ग्लास कोमट दुधात एक किंवा दोन चमचे बदाम पावडर मिसळून पिऊ शकता.