उन्हाळ्यात शरीर थंड आणि निरोगी ठेवण्यासाठी दही आणि गूळ खाणं खूप फायदेशीर आहे. पचनसंस्था मजबूत करणं, ऊर्जा वाढवणं, रोगप्रतिकारक शक्ती सुधारणं, आणि त्वचा निरोगी ठेवण्यासाठी याची मदत होते. दररोज दह्यामध्ये गुळ मिसळून खाण्याचे 5 मुख्य फायदे जाणून घेऊया.
1. पचनसंस्था मजबूत होते -
दह्यामध्ये प्रोबायोटिक्स असतात, आतड्यांचं आरोग्य सुधारण्यासाठी याचा उपयोग होतो. गुळामुळे पचन सुधारतं आणि गॅस आणि आम्लतेची समस्या कमी होते.
advertisement
Summer Care - सूर्यप्रकाशापासून करा डोळ्यांचं रक्षण, सोपे उपाय वापरा, डोळे जपा
2. शरीराला थंडावा मिळतो -
उन्हाळ्यात उष्माघात आणि उष्णतेच्या लाटेपासून बचाव करण्यासाठी दही आणि गूळ खाणं फायदेशीर आहे. यामुळे शरीराला थंडावा मिळतो, घामाचं प्रमाण कमी होतं.
3. वजन संतुलित करण्यासाठी उपयुक्त -
गुळामुळे भूक नियंत्रित होते. दह्यामुळे चरबी जाळण्यास मदत होते. या दोन्हीचं मिश्रण वजन कमी करण्यासाठी आणि वाढवण्यासाठी फायदेशीर आहे.
4. रोगप्रतिकारक शक्ती वाढते -
दह्यामध्ये चांगले बॅक्टेरिया असतात, जे शरीराला अनेक आजारांशी लढण्यासाठी शक्ती देतात. त्याच वेळी, गुळामध्ये लोह, मॅग्नेशियम आणि जस्त असते, ज्यामुळे रक्त शुद्धीकरण आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते.
Summer Care : उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी खास टिप्स, घरगुती उपायांची होईल मदत
5. शरीराला ऊर्जा मिळते -
गुळामध्ये असलेली नैसर्गिक साखर हळूहळू बाहेर पडते, ज्यामुळे शरीराला त्वरित आणि कायमस्वरूपी ऊर्जा मिळते. त्याच वेळी, दह्यामध्ये प्रथिनं आणि कॅल्शियम असते, ज्यातून स्नायूंना ताकद मिळते.
दही - गुळ खाण्याचे फायदे -
सकाळी किंवा दुपारच्या जेवणानंतर, एक वाटी दही आणि थोडासा गूळ मिसळून खा.
उन्हाळ्यात बाहेर जाण्यापूर्वी खाल्ल्यानं उष्माघातापासून बचाव होतो.
उन्हाळ्यात दही आणि गूळ खाल्ल्यानं शरीर थंड, निरोगी आणि ऊर्जावान राहण्यास मदत होते.
पचन, वजन, रोगप्रतिकारक शक्ती आणि उर्जेसाठी अत्यंत फायदेशीर.