चेहऱ्यावर आपण अनेक रासायनिक उत्पादनं वापरतो, पण काही वेळा त्वचेवर नैसर्गिक गोष्टींचा परिणाम चांगला होतो. नैसर्गिक गोष्टी त्वचेला आतून सुधारण्याचं काम करतात, त्वचेशी संबंधित समस्या कमी करण्यासाठी आणि केमिकलमुळे त्वचेचं नुकसान होण्यापासून यामुळे संरक्षण होतं.
Skin Care : त्वचेसाठी रामबाण उपाय - नारळाचं तेल, त्वचा राहिल मुलायम
त्वचेला आवश्यक आर्द्रता यामुळे मिळते. कोलेजन वाढवण्यासही यामुळे मदत होते. बाह्य घटकांपासून त्वचेचं संरक्षण होतं.
advertisement
खोबरेल तेल
खोबरेल तेलातील लॉरिक ऍसिडमुळे त्वचेची जळजळ होत नाही. खोबरेल तेलात व्हिटॅमिन ई आणि फॅटी ऍसिड देखील असतात. या तेलाचा वापर केल्यानं डोळ्यांखाली काळी वर्तुळं, डाग, सुरकुत्या यांची समस्या कमी होते. खोबरेल तेल उत्तम मॉइश्चरायझर म्हणून काम करते. ज्यांची त्वचा कोरडी आहे त्यांनी हे तेल रात्रभर चेहऱ्यावर ठेवू शकता. तेलकट त्वचा असलेल्यांनी हे तेल जास्त काळ चेहऱ्यावर ठेवू नये.
Skin Care : चेहरा सतेज राहण्यासाठी करा या गोष्टी...निगा राखणं होईल सोपं
बदाम तेल
बदाम तेलामुळे त्वचेला व्हिटॅमिन ई सारखे अँटी-ऑक्सिडेंट मिळतं, फॅटी ऍसिडमुळे, बदामाचे तेल त्वचेला हायड्रेट ठेवतं आणि यामुळे चेहरा चमकदार दिसतो. बदामाच्या तेलाचा परिणाम काळी वर्तुळे आणि डाग कमी करण्यावरही दिसून येतो. बदामाच्या तेलाचे 3 ते 4 थेंब दररोज संपूर्ण चेहऱ्यावर लावता येतात.
ऑलिव्ह तेल
ऑलिव्ह ऑईल चेहऱ्यावर लावल्यानं त्वचा व्यवस्थित स्वच्छ होते, त्वचेत आर्द्रता राहते, चमक येते, मुरुम येण्याची शक्यता कमी होते आणि त्याचबरोबर वातावरणामुळे होणारं नुकसानही कमी होतं. दिवसातून एकदा चेहऱ्यावर ऑलिव्ह ऑइल लावा. हे काही वेळानं धुवा किंवा तुम्हाला हवं असेल तर तुम्ही रात्रभर चेहऱ्यावर लावू शकता.