रोजच्या धावपळीत आपण अनेकदा आरोग्याकडे दुर्लक्ष होतं. वेळेअभावी त्वचा कोरडी आणि निर्जीव होते. यासाठी त्वचा तज्ज्ञांनी तुमची त्वचा चमकदार करण्यासाठी काही खास टिप्स दिल्या आहेत. डोळ्यांभोवती असलेली काळी वर्तुळं, डाग या अनेकांसमोरच्या समस्या असतात. अशावेळी हळद आणि चंदनाचा नियमित वापर केला तर चेहऱ्यावरची चमक कायम ठेवता येते.
advertisement
चेहऱ्याची चमक कायम ठेवायची असेल, तर आजपासूनच महागड्या सौंदर्य उत्पादनांऐवजी आयुर्वेदिक गोष्टींचा अवलंब करण्याचा सल्ला त्वचा विकार तज्ज्ञ देतात. आजपासूनच महागड्या सौंदर्य उत्पादनांऐवजी हळद आणि चंदनाचा वापर करा.
आयुर्वेदातही हळद सर्वात महत्त्वाची औषधी वनस्पती मानली जाते. म्हणून आयुर्वेदानुसार चंदन किंवा पांढऱ्या चंदनाला श्रीगंधा असेही म्हणतात. दोन्हीमध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म आढळतात. तज्ज्ञांच्या मते, या दोन्ही गोष्टींमुळे त्वचेला जीवदान मिळतच पण अनेक समस्या दूर करण्यातही मदत होते.
Chapped Lips : फुटलेल्या ओठांसाठी उपयुक्त ठरेल टॉमेटोचा रस, मध, लिंबाचाही करा वापर
चेहऱ्यावर हळद आणि चंदनाचा फेस पॅक वापरू शकता. डाग कमी करण्यासोबतच चंदनामुळे तुमचा रंग सुधारण्यास मदत होते. यामुळे चेहऱ्यावरील फोडांशी संबंधित समस्यांनाही आळा बसतो. याचा नियमित वापर केला तर त्याचे फायदे नक्की दिसतील.
चंदन आणि हळद यांचा फेस पॅक बनवण्यासाठी दोन चमचे चंदन पावडरमध्ये चिमूटभर हळद आणि गुलाबपाणी घालून चांगलं मिसळा. आठवड्यातून किमान दोनदा ते चेहऱ्यावर लावा. 20 ते 30 मिनिटं ठेवा आणि चेहरा स्वच्छ पाण्यानं धुवा. तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या त्वचेच्या ऍलर्जीचा त्रास होत असेल, तर डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच वापरा.