नवी दिल्ली : उन्हाळ्यात अनेकजणांना पोटाच्या विकारांचा सामना करावा लागतो. कारण या दिवसांत अनेक पदार्थ पोटाला बाधतात. याबाबत डॉक्टर काय सांगतात जाणून घेऊया. उन्हाळ्यात आपला आहार नेमका कसा असायला हवा, यासंदर्भात त्यांनी सविस्तर माहिती दिली आहे.
डॉ. अंकुर जैन यांनी सांगितलं की, पोटासाठी बडिशेप, जिरं आणि ओव्याचं पाणी सर्वोत्तम असतं. कारण या पदार्थांमध्ये पचनासंबंधित औषधी गुणधर्म भरपूर प्रमाणात असतात. जे पोटासाठी फायदेशीर ठरतात. म्हणूनच हे पाणी दररोज सकाळी उपाशीपोटी पिण्याचा सल्ला दिला जातो.
advertisement
हेही वाचा : तुळस उन्हाळ्यातही हिरवीगार राहिल, पानं अजिबात सुकणार नाहीत! 'अशी' घ्या काळजी
डॉक्टरांनी सांगितलं की, जिरं, बडिशेप आणि ओव्याच्या पाण्याचे आरोग्याला अनेक फायदे होतात. दररोज हे पाणी प्यायल्यास अन्नपचन सुरळीत होतं. विशेष म्हणजे या पाण्यामुळे वजन कमी होण्यास प्रचंड मदत मिळते. तसंच संपूर्ण शरीर स्वच्छ होतं.
डॉक्टरांनी पुढे सांगितलं की, गरोदर महिलांनी हे पाणी प्यायल्यास स्तनांमध्ये भरपूर दूधनिर्मिती होण्यास मदत मिळते. परंतु जसे काही पदार्थांचे फायदे असतात तसे तोटेही असतातच. त्यामुळे कोणत्याही पदार्थांचं सेवन करण्यापूर्वी आपण स्वत: डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
लेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनलला करा फॉलो...या लिंकवर क्लिक करा