तुळस उन्हाळ्यातही हिरवीगार राहिल, पानं अजिबात सुकणार नाहीत! 'अशी' घ्या काळजी

Last Updated:
तुळशीचं रोप अनेक घरांमध्ये असतं. प्रखर उन्हात जशी आपली त्वचा काळवंडते, त्वचेवरचं तेज निघून जातं तशीच तुळशीची पानंही सुकतात. परंतु काही विशिष्ट उपायांनी आपण या पानांचं रक्षण करू शकतो. ज्यामुळे उन्हाळ्यातही आपली तुळस छान हिरवीगार दिसेल. (लखेश्वर यादव, प्रतिनिधी / जांजगीर चांपा)
1/5
अनेक घरांमध्ये तुळशीला पूजलं जातं. या रोपाला उन्हाची नितांत गरज असते. परंतु तापमान अगदीच 42 डिग्री सेल्सियसवर गेलं की मात्र तुळशीला ते सहन होत नाही. अशावेळी तुळशीची पानं जळून सुकतात.
अनेक घरांमध्ये तुळशीला पूजलं जातं. या रोपाला उन्हाची नितांत गरज असते. परंतु तापमान अगदीच 42 डिग्री सेल्सियसवर गेलं की मात्र तुळशीला ते सहन होत नाही. अशावेळी तुळशीची पानं जळून सुकतात.
advertisement
2/5
तज्ज्ञ सांगतात की, ज्या मातीत तुळशीच्या रोपाची लागवड केलेली असते ती माती कायम मऊ ठेवण्यासाठी रोपाला दिवसातून कमीत कमी दोनवेळा पाणी द्यावं. परंतु माती एवढी ओली व्हायला नको की, रोप त्यातून बाहेर निघेल. कुंडीतली माती कमीत कमी 3 इंचावर सुकल्यानंतरच पुन्हा रोपाला पाणी द्यावं.

3/5
जर तुळस कुंडीत लावली असेल तर जिथे सावली येईल तिथेच ती कुंडी ठेवा, जेणेकरून पानं कोमेजणार नाहीत. जर रोपाची लागवड जमिनीतच केलेली असेल तर प्रखर उष्णतेपासून वाचवण्यासाठी आपण या रोपाला कापडानेही झाकू शकता. 

4/5
 आपण मल्चिंग ही अच्छादनाची पद्धत वापरूनही रोपाच्या मातीतला  टिकवून ठेवू शकता. रोपाच्या ज्या फांद्या जास्त सुकलेल्या असतील त्या कापू शकता. त्यामुळे नवीन फांद्या येतील आणि रोप छान हिरवंगार बहरलेलं दिसेल.
आपण मल्चिंग ही अच्छादनाची पद्धत वापरूनही रोपाच्या मातीतला ओलावा टिकवून ठेवू शकता. रोपाच्या ज्या फांद्या जास्त सुकलेल्या असतील त्या कापू शकता. त्यामुळे नवीन फांद्या येतील आणि रोप छान हिरवंगार बहरलेलं दिसेल.
advertisement
5/5
 तुळशीच्या रोपात फूल आणि बीज असतात. रोपातलं सगळं  या फुलांना आणि बिजाला जातं. त्यामुळे वेळीच ती तोडावी. त्यामुळे तुळशीच्या पानांना योग्य प्रमाणात  तत्त्व मिळतात.
तुळशीच्या रोपात फूल आणि बीज असतात. रोपातलं सगळं पोषण या फुलांना आणि बिजाला जातं. त्यामुळे वेळीच ती तोडावी. त्यामुळे तुळशीच्या पानांना योग्य प्रमाणात पोषक तत्त्व मिळतात.
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement