कॅल्शियमचा विचार केला जातो तेव्हा पहिलं नाव मनात येतं ते म्हणजे दूध. दुधात कॅल्शियम भरपूर असतं आणि कॅल्शियमची कमतरता पूर्ण करण्यासाठी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच दूध पिण्याचा सल्ला दिला जातो.
शरीराला अनेक कारणांसाठी कॅल्शियमची गरज असते. कॅल्शियम हाडं मजबूत करण्यासाठी, हृदयाच्या आरोग्यासाठी, स्नायूंसाठी, नसा आणि रक्ताशी संबंधित समस्यांसाठी खूप महत्वाचं आहे. अशा परिस्थितीत शरीरात कॅल्शियमची कमतरता असेल तर हाडं कमकुवत होणं ही एक मोठी समस्या बनते.
advertisement
Constipation : बद्धकोष्ठतेवर घरगुती उपाय, रात्री झोपण्यापूर्वी भिजवून ठेवा बडिशेप आणि मनुका
अशा परिस्थितीत कॅल्शियम भरपूर प्रमाणात घेणं गरजेचं आहे. पण, तुम्ही दूध पीत नसाल तर इतर काही पदार्थ खाऊ शकता. हे पदार्थ कॅल्शियमनं समृद्ध असतात आणि यामुळे अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात.
नाचणी
नाचणीमध्ये भरपूर कॅल्शियम असतं 100 ग्रॅम नाचणीपासून शरीराला 350 मिलीग्राम कॅल्शियम मिळतं. नाचणी आठवड्यातून 3 ते 4 वेळा खाल्लं तर शरीराला कॅल्शियम पुरेशा प्रमाणात मिळतं. नाचणीपासून डोसे, लाडू इत्यादी पदार्थ तयार करता येतात.
चणे
पांढरे चणे हा कॅल्शियमचा चांगला स्रोत आहे. 2 कप चण्यामध्ये 420 मिलीग्राम कॅल्शियम असतं. चण्याची भाजी, सॅलड, कटलेट असे अनेक पदार्थ बनवता येतात.
Beetroot : पोषक असलं तरी काहीच्या तब्येतीसाठी बीट खाणं हानिकारक....या टिप्स नक्की लक्षात ठेवा
बदाम
सुक्या मेव्यामध्ये अनेक गुण असतात. या ड्रायफ्रुट्समध्ये बदामाचाही समावेश आहे. बदाम केवळ प्रथिनं आणि जीवनसत्त्वच नाही तर कॅल्शियमचाही उत्तम स्रोत आहे. बदाम नुसतेही खाल्ले जाऊ शकतात, स्मूदीमध्ये घालता येतात, लाडूतही बदामाचा वापर केला जातो.
तीळ
2 चमचे तिळात 350 मिलीग्राम कॅल्शियम असतं. तीळ खाल्ल्यानं शरीराला भरपूर कॅल्शियम मिळतं. लाडू आणि हलवा बनवण्यासोबतच तिळाचा वापर सॅलड आणि मसालेदार पदार्थ बनवण्यासाठीही करता येतो.
चिया
चिया सीड्सचा वापर अनेकदा वजन कमी करण्यासाठी आहारात असतो. यातूनही शरीराला भरपूर कॅल्शियम मिळतं. 4 चमचे चिया बियाण्यापासून शरीराला 350 मिलीग्राम कॅल्शियम मिळतं. चिया सीड्स पाण्यात मिसळून प्यायल्या जाऊ शकतात किंवा स्मूदी, शेक आणि पुडिंगमध्येही घालता येतात.