1. पालक
पालक ही हिरवी पालेभाजी, आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते. पालकात व्हिटॅमिन के आणि फोलेट हे घटक असतात. यामुळे रक्ताच्या गुठळ्या तयार होण्यास प्रतिबंध होते आणि रक्तवाहिन्या निरोगी राहतात.
Constipation : बद्धकोष्ठतेवर करुन बघा हा उपाय, पचनक्रियाही सुधारेल
2. भेंडी
भेंडीची भाजी साधारणपणे सर्वांनाच खायला आवडते. भेंडीमध्ये विरघळणारे फायबर भरपूर असते, यामुळे खराब कोलेस्ट्रॉल (LDL) कमी करण्यास मदत होते.
advertisement
3. गाजर
गाजर खाण्यानं कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते. गाजरांमध्ये बीटा-कॅरोटीन असते, जे कोलेस्टेरॉलचं ऑक्सिडेशन रोखते आणि रक्तवाहिन्या निरोगी ठेवते.
Hair Growth : केसांच्या निरोगी वाढीसाठी फळांचा पर्याय, केस गळणं होईल बंद
4. लसूण
लसूण हे स्वयंपाकघरातील महत्त्वाचा घटक, जो आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानला जातो. लसणामध्ये ॲलिसिन असतं, यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास आणि रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत होते.
5. टोमॅटो
टोमॅटो जवळजवळ प्रत्येक घरात सर्रास वापरला जाणारा घटक. टोमॅटोमध्ये लाइकोपीन असते, जे कोलेस्टेरॉलचं ऑक्सिडेशन रोखतं आणि हृदयविकाराचा धोका कमी करतं.