संशोधनात काय आढळले?
या संशोधनात 4,000 हून अधिक व्यक्तींचा समावेश होता, ज्यांचे 19 वर्ष सातत्याने निरीक्षण करण्यात आले. अभ्यासात असे दिसून आले की, जे लोक आठवड्यात 300 ग्रॅमपेक्षा जास्त पांढरे मांस (व्हाईट मांस), विशेषतः चिकन, खातात, त्यांचा मृत्युदर 100 ग्रॅमपेक्षा कमी मांस खाणाऱ्यांच्या तुलनेत 27 टक्के जास्त आहे. विशेषतः पुरुषांमध्ये हा धोका अधिक आहे. आठवड्यात 300 ग्रॅमपेक्षा जास्त चिकन खाणाऱ्या पुरुषांना पचनसंस्थेशी संबंधित कर्करोगामुळे मृत्यूचा धोका दुप्पट असल्याचे संशोधकांना आढळले. याउलट, 1000 ग्रॅमपेक्षा कमी चिकन खाणाऱ्यांमध्ये हा धोका तुलनेने कमी होता.
advertisement
संशोधनात असेही नमूद करण्यात आले की, चिकनचे अतिसेवन केवळ कर्करोगाचाच धोका वाढवत नाही, तर एकूणच मृत्युदरावरही त्याचा परिणाम होतो. डायेटरी गाइडलाइन्स फॉर अमेरिकन 2025-25 च्या अहवालातही चिकन, टर्की, बदक, हंस आणि गेम बर्ड यांसारख्या पांढऱ्या मांसाचे सेवन मर्यादित ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
उन्हाळ्यात आरोग्य राखायचंय? तर आहारात घ्या 'ही' पांढरी वस्तू; पोट राहील थंड अन् त्वचेवर येईल तेज
संशोधनाच्या मर्यादा
या संशोधनाला काही मर्यादाही आहेत. यात प्रक्रिया केलेल्या चिकनच्या (प्रोसेस्ड चिकन) वापराबाबत तसेच अन्न शिजवण्याच्या पद्धतींबाबत कोणतीही माहिती समाविष्ट करण्यात आलेली नाही. उदाहरणार्थ, चिकन तळणे, भाजणे किंवा उकडणे यामुळे त्याच्या पौष्टिकतेवर आणि आरोग्यावर होणाऱ्या परिणामांवर फरक पडू शकतो. तसेच, या अभ्यासात सहभागी व्यक्तींच्या शारीरिक हालचालींचा (फिजिकल अॅक्टिव्हिटी) विचार करण्यात आला नाही. आहार प्रश्नावलीत केवळ मांसाच्या सेवनाची नोंद घेण्यात आली, ज्यामुळे इतर आहार घटकांचा प्रभाव तपासला गेला नाही.
कोल्हापुरातील डॉ. अविनाश शिंदे यांनी या संशोधनाबाबत सविस्तर माहिती देताना सांगितले की, चिकन हे पौष्टिक अन्न आहे, परंतु त्याचे अतिसेवन टाळणे आवश्यक आहे. चिकनमध्ये प्रथिने आणि इतर पोषक तत्त्वे असतात, परंतु त्याचे प्रमाण आणि शिजवण्याची पद्धत यावर बरेच काही अवलंबून आहे. तळलेले किंवा प्रक्रिया केलेले चिकन आरोग्यासाठी अधिक हानिकारक ठरू शकते. तसेच, संतुलित आहार आणि नियमित व्यायाम यामुळे कर्करोगाचा धोका कमी होऊ शकतो. तसेच या संशोधनात काही मर्यादा असल्या, तरी त्यातून एक गोष्ट स्पष्ट होते की, कोणत्याही अन्नाचे अतिसेवन हानिकारक ठरू शकते. लोकांनी आपल्या आहारात वैविध्य ठेवावे आणि मांसबरोबरच हिरव्या पालेभाज्या, फळे आणि कडधान्यांचा समावेश करावा.
काय आहे उपाय?
संशोधनाच्या निष्कर्षांनुसार, आठवड्यात 100 ग्रॅमपेक्षा कमी चिकन खाणे हा सुरक्षित पर्याय आहे. याशिवाय, चिकन शिजवताना तळण्याऐवजी उकडणे किंवा ग्रिल करणे यासारख्या आरोग्यदायी पद्धतींचा अवलंब करावा. तसेच, आहारात फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करणे आणि नियमित शारीरिक हालचाल ठेवणे यामुळे पचनसंस्थेचे आरोग्य सुधारू शकते.
डॉक्टरांचा सल्ला
हा अभ्यास सामान्य लोकांसाठी एक इशारा आहे की, चिकनसारख्या पौष्टिक अन्नाचाही अतिरेक टाळावा. विशेषतः पुरुषांनी याबाबत अधिक सावध राहणे गरजेचे आहे. तज्ज्ञांच्या मते, आहारात संतुलन राखणे आणि नियमित वैद्यकीय तपासणी करणे यामुळे कर्करोगासारख्या गंभीर आजारांचा धोका कमी होऊ शकतो.
या संशोधनाने चिकनच्या अतिसेवनाबाबत नवीन चर्चा सुरू केली आहे. त्यामुळे आता खाद्यप्रेमींनी आपल्या आहाराच्या सवयींवर पुनर्विचार करणे गरजेचे आहे. संतुलित आहार आणि निरोगी जीवनशैली हेच दीर्घायुष्याचे रहस्य आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे.





