'डेली मेल'च्या बातमीत तज्ज्ञ सांगतात, की हृदयरोगाची पहिली लक्षणं आपल्या शरीरात सर्वात आधी पायांमध्ये दिसतात. खरं तर, जेव्हा रक्ताच्या नसांमध्ये चिकट कोलेस्ट्रॉल जमा व्हायला लागतं, तेव्हा रस्ता अरुंद होतो, त्यामुळे शरीराच्या दूरच्या भागांमध्ये कमी रक्त पोहोचतं. त्यामुळे पायांमध्ये त्याची लक्षणं दिसायला लागतात.
रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्ट्राॅल जमा झाल्यामुळे होणारे त्रास
बातमीनुसार, जेव्हा हृदयाकडून पायापर्यंत योग्य प्रमाणात रक्त आणि ऑक्सिजन पोहोचत नाही, तेव्हा हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघाताचा धोका खूप वाढतो. घोट्यांपर्यंत पोहोचताना रक्तवाहिन्या आधीच खूप बारीक होतात, त्यामुळे तिथे रक्त पोहोचायला आधीच त्रास होतो. आणि जेव्हा रक्तवाहिन्या ब्लॉक व्हायला लागतात, तेव्हा आणखी जास्त त्रास होतो. पायांपर्यंत कमी रक्त पोहोचलं, की तिथे थंड वाटतं, पाय सुन्न होतात. काही वेळा पायांमध्ये दुखतं आणि सूजही येते. पायांपर्यंत कमी रक्त पोहोचलं, की त्याचा परिणाम नखांवरही होतो. त्यामुळे नखं कमजोर आणि ठिसूळ व्हायला लागतात.
advertisement
काय करायला हवं?
डॉक्टर सांगतात, की आपण नेहमी आपल्या पायांची काळजी घेतली पाहिजे. अगदी नखांचीसुद्धा. कारण पायांच्या आरोग्याचा परिणाम आपल्या संपूर्ण शरीराच्या आरोग्याची गोष्ट सांगतो. अनेक प्रकारच्या रोगांची लक्षणं सर्वात आधी पायांमध्ये दिसतात. संशोधनानुसार, 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या चारपैकी एका व्यक्तीला कोणत्या ना कोणत्या प्रकारे हृदयविकाराचा सामना करावा लागतो. वेळेवर पायांकडे लक्ष दिलं, तर हृदयविकाराच्या गुंतागुंती आधीच कमी करता येऊ शकतात.
रक्तवाहिन्यांमध्ये चरबी जमा व्हायला लागली, तर त्याला पेरिफेरल आर्टरी डिसीज (peripheral artery disease) म्हणतात. त्याची लक्षणंही पायांमध्ये दिसतात. यामध्ये, पायांमध्ये वारंवार दुखतं आणि चालताना खूप त्रास होतो. मात्र, हे दुखणं थोड्या वेळानंतर गायब होतं, त्यामुळे लोक सहसा लक्ष देत नाहीत. यामध्ये, दोन्ही पायांमध्ये एकाच वेळी दुखतं. पायांमध्ये मुंग्या येणं, दुखणं, जळजळणं, त्वचा कोरडी होणं, त्वचा फाटायला लागणं, फोड येणं, जखमा होणं, हे सगळं हलक्यात घेऊ नये. ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधावा.
हे ही वाचा : झोपेचा भावनांशी थेट असतो संबंध, झोपण्यापूर्वी हे काम करा, नेहमी रहाल आनंदी अन् फ्रेश
हे ही वाचा : व्यायामापूर्वी प्या 'हे' खास घरगुती एनर्जी ड्रिंक, मिळेल भरपूर ताकद अन् होईल मसल्स ग्रोथ! कशी तयार कराल ड्रिंक?
