झोपेचा भावनांशी थेट असतो संबंध, झोपण्यापूर्वी हे काम करा, नेहमी रहाल आनंदी अन् फ्रेश
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
संशोधनानुसार, झोप आणि भावना यांचा परस्पर संबंध आहे. आनंदी लोकांना चांगली झोप मिळते, तर तणाव, चिंता आणि नैराश्य झोपेवर परिणाम करतात. झोप सुधारण्यासाठी मानसिक आरोग्य महत्त्वाचे आहे. नियमित वेळेत...
बहुतेक लोकांना रात्री उशिरापर्यंत जागे राहण्याची सवय असते. लोकं लवकर का झोपत नाहीत, यावर अनेक संशोधनंही झाली आहेत. अलीकडील संशोधनात असं समोर आलं आहे की, एखाद्या व्यक्तीच्या भावना त्याच्या झोपेच्या गुणवत्तेवर परिणाम करू शकतात. आपल्या भावना आणि झोप यांचा एकमेकांशी खूप जवळचा संबंध आहे. आनंद आणि सकारात्मक भावना चांगली आणि दीर्घ झोप घेण्यास मदत करतात, तर दुःख आणि नैराश्य निद्रानाश आणि खराब झोपेचं कारण बनू शकतं.
अभ्यासानुसार, जे लोकं आनंदी आणि समाधानी असतात, ते जास्त वेळ आणि चांगली झोप घेतात. त्यांचं मानसिक आरोग्य चांगलं असतं, ज्यामुळे त्यांचं शरीर आणि मन लवकर विश्रांतीच्या अवस्थेत जातं. याउलट, जे लोकं नैराश्य, चिंता किंवा दुःखाचा सामना करत आहेत, त्यांच्या झोपेची गुणवत्ता बिघडते. अशा लोकांना झोप येण्यास जास्त वेळ लागू शकतो आणि ते वारंवार झोपेतून उठू शकतात.
advertisement
झोप आणि भावनांमधील दुहेरी संबंध
हा संबंध केवळ एका दिशेने जाणारा नाही, तर दुहेरी आहे. याचा अर्थ, जसा भावनांचा झोपेवर परिणाम होतो, तसाच खराब झोपेमुळे नकारात्मक भावनाही वाढू शकतात. जेव्हा एखादी व्यक्ती चांगली झोप घेत नाही, तेव्हा त्याचा मूड बिघडू शकतो आणि त्याला जास्त ताण, चिंता किंवा नैराश्य जाणवू शकतं. यामुळे तो दुसऱ्या दिवशी दुःखी किंवा चिडचिडा होऊ शकतो, ज्यामुळे त्याच्या झोपेच्या चक्रावर आणखी परिणाम होतो.
advertisement
advertisement
झोप सुधारण्यासाठी काय करावं?
तज्ज्ञांच्या मते, तुम्हाला तुमची झोप सुधारायची असेल, तर मानसिक आरोग्याची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे. रात्री झोपण्यापूर्वी मोबाईल आणि लॅपटॉपपासून दूर राहा, कारण स्क्रीनचा निळा प्रकाश मन सक्रिय ठेवतो आणि झोपेत व्यत्यय आणतो. दररोज किमान 7-8 तास झोपा आणि झोपण्याची आणि उठण्याची वेळ निश्चित करा. ध्यान आणि योगा करा, यामुळे मन शांत राहील आणि तुम्हाला चांगली झोप मिळेल. झोपण्यापूर्वी कॅफिन आणि जड जेवण टाळा, कारण त्याचा झोपेवर परिणाम होऊ शकतो. आनंदी आणि सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करा, कारण आनंदी मन चांगली झोप घेण्यास मदत करतं.
advertisement
हे ही वाचा : चश्मा लावण्याची गरजच राहणार नाही, दुधात मिक्स करून 'ही' पावडर खा, यासाठी किचनमधील 4 वस्तू आहेत आवश्यक!
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
February 22, 2025 7:57 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
झोपेचा भावनांशी थेट असतो संबंध, झोपण्यापूर्वी हे काम करा, नेहमी रहाल आनंदी अन् फ्रेश


