पाकिस्तान क्रिकेटची कॉमेडी सर्कस, कॅप्टनला दिलं असं काम... Cricket विश्वाने डोक्याला हात मारून घेतला!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने घेतलेल्या एका निर्णयामुळे पुन्हा एकदा जगासमोर त्यांचं हसं झालं आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने त्यांच्या टेस्ट टीमचा कर्णधार शान मसूद याच्यावर नवी जबाबदारी सोपवली आहे.
मुंबई : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने घेतलेल्या एका निर्णयामुळे पुन्हा एकदा जगासमोर त्यांचं हसं झालं आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने त्यांच्या टेस्ट टीमचा कर्णधार शान मसूद याच्यावर नवी जबाबदारी सोपवली आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने शान मसूद याची आंतरराष्ट्रीय क्रिकेट सल्लागार म्हणून नेमणूक केली आहे, तसंच त्याच्यावर क्रिकेट ऑपरेशनचा संचालक म्हणून जबाबदारी सोपवली आहे. शान मसूद हा पाकिस्तानच्या टेस्ट टीमचा कर्णधार आहे, तसंच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या 2025-27 च्या सत्रात पाकिस्तानी टीमचं नेतृत्व शान मसूद याच्याकडे सोपवण्यात आलं आहे.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा मोठा निर्णय
बोर्डमध्ये एकमत आहे की शान मसूद आंतरराष्ट्रीय क्रिकेट ऑपरेशन्स विभागाचे नेतृत्व करण्यासाठी सर्वात योग्य आहे. याआधी अशी शक्यता होती की माजी कर्णधार आणि माजी मुख्य प्रशिक्षक मिसबाह-उल-हक याचा या भूमिकेसाठी विचार केला जाऊ शकतो. पण, सूत्रांनी पुष्टी केली आहे की मिसबाहने पूर्वीच्या व्यावसायिक वचनबद्धतेमुळे या पदावरून माघार घेतली आहे, यामुळे शान मसूदचा मार्ग मोकळा झाला. एका सूत्राने सांगितले की, "सध्या, जेव्हाही तो संचालक म्हणून पदभार स्वीकारेल तेव्हा तो क्रिकेट खेळत राहील, पण त्याने या पदासाठी रस दर्शविला आहे कारण तो जाहिरातीतील पदासाठी सर्व निकष पूर्ण करतो."
advertisement
पाकिस्तानचा पराभव
शान मसूदने अलीकडेच दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दोन सामन्यांच्या टेस्ट सीरिजमध्ये पाकिस्तानचे नेतृत्व केले, जी 1-1 अशी बरोबरीत संपली. लाहोरच्या गडाफी स्टेडियमवर झालेल्या पहिल्या टेस्टमध्ये पाकिस्तानचा 93 रननी विजय झाला. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेने रावळपिंडीतील दुसरी टेस्ट आठ विकेट्सने जिंकून पुनरागमन केले. 9 वनडे आणि 19 टी-20 सामने खेळणाऱ्या शान मसूदने या सीरिजमध्ये बॅटिंगमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली. तो सीरिजमध्ये सर्वाधिक रन करणारा दुसऱ्या क्रमांकाचा बॅटर होता. डावखुरा बॅटर असलेल्या या बॅटरने दोन सामन्यांमध्ये 42.50 च्या सरासरीने 170 रन केल्या. रावळपिंडीतील पहिल्या डावात त्याची सर्वोच्च धावसंख्या 87 होती.
advertisement
सध्याच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या पॉईंट्स टेबलमध्ये पाकिस्तान 12 पॉईंट्स आणि 50% विजयी टक्केवारीसह चौथ्या क्रमांकावर आहे. सक्रिय खेळाडू असलेला शान मसूद आता प्रशासकीय भूमिकाही सांभाळेल. तो दोन्ही जबाबदाऱ्या किती चांगल्या प्रकारे पार पाडतो हे पाहणे मनोरंजक असेल, पण या निर्णयावरुन पाकिस्तान क्रिकेटला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर ट्रोल करण्यात येत आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 24, 2025 11:46 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
पाकिस्तान क्रिकेटची कॉमेडी सर्कस, कॅप्टनला दिलं असं काम... Cricket विश्वाने डोक्याला हात मारून घेतला!


