चश्मा लावण्याची गरजच राहणार नाही, दुधात मिक्स करून 'ही' पावडर खा, यासाठी किचनमधील 4 वस्तू आहेत आवश्यक!
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
डोळ्यांची कमजोर दृष्टी, सतत पाणी येणे, जळजळ यासारख्या समस्यांसाठी आयुर्वेदिक डॉक्टर रॉबिन शर्मा यांनी देशी पावडर सुचवली आहे. बदाम, मिश्री, बडीशेप आणि काळी मिरी यांचे मिश्रण करून तयार केलेली ही पावडर...
आजकाल लहान वयातच मुलं जाड चष्मे घालतायत. किशोरवयीन, प्रौढ किंवा शाळेत जाणारी मुलं असोत, प्रत्येकाला डोळ्यांच्या समस्या होत आहेत. मुलांची दृष्टी कमजोर होण्याची अनेक कारणं असू शकतात, जसं की सतत टीव्ही, मोबाईल पाहणं, अनहेल्दीं पदार्थ खाणं इत्यादी. आहारात पोषक तत्वांच्या कमतरतेमुळेही दृष्टी कमजोर होते. तुम्हालाही काही दिवसांपासून डोळ्यांच्या समस्या होत असतील, डोळ्यांना पाणी येत असेल, जळजळ होत असेल. लॅपटॉप किंवा मोबाईल वापरताच डोळे लाल होत असतील, तर सावध व्हा. यामुळे तुमची दृष्टी कमजोर होऊ शकते. लहान वयात चष्मा लागणं टाळण्यासाठी, नैसर्गिक गोष्टींपासून बनवलेली ही घरगुती पावडर खा...
ही देशी पावडर डोळे ठेवेल निरोगी
आयुर्वेदिक डॉक्टर रॉबिन शर्मा यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट dr.sharmarobin वर एका पोस्टमध्ये एका पावडरबद्दल सांगितलं आहे, जी डोळे निरोगी ठेवू शकते. तुमच्या घरात ठेवलेल्या काही गोष्टींचं नियमित सेवन करून तुम्ही तुमचे डोळे दीर्घकाळ निरोगी ठेवू शकता.
पावडर कशी तयार कराल?
- बदाम - 100 ग्रॅम
- खडीसाखर - 100 ग्रॅम
- बडीशेप - 100 ग्रॅम
- काळी मिरी - 20 ग्रॅम
advertisement
आता हे सर्व घटक मिक्सरमध्ये टाकून बारीक करा. पावडर झाल्यावर काढून घ्या. ती एका बरणीत ठेवून घट्ट बंद करा. आता एक चमचा दूध मिसळून किंवा न मिसळता खा. तुम्ही दिवसातून दोन ते तीन वेळा सेवन करू शकता. तुम्ही तुमच्या घरातील सर्व सदस्यांना देऊ शकता. तुम्ही मुलांनाही खायला देऊ शकता. यामुळे कोणतंही नुकसान होणार नाही. डोळ्यांशी संबंधित अनेक समस्यांपासून तुमची सुटका होईल. यासोबतच, ही पावडर तुमच्या त्वचा आणि केसांचं आरोग्यही सुधारेल.
advertisement
तुमचे डोळे राहतील निरोगी
तुम्ही ही पावडर मुलांना खाऊ घातल्यास, त्यांचे डोळे नेहमी निरोगी राहतील. दृष्टी किंवा इतर कोणतीही समस्या त्यांना कधीही त्रास देणार नाही. शरीराला अनेक पोषक तत्वंही मिळतील. बडीशेप, बदाम, खडीसाखर किंवा काळी मिरी असो, हे सर्व अनेक प्रकारच्या पौष्टिक घटकांनी समृद्ध आहेत.
advertisement
हे ही वाचा : डाएट नाही, जिम नाही! तरीही 14 महिन्यांत या महिलेनं कमी केलं तब्बल 42kg, त्यामागचं नेमकं सिक्रेट काय?
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
February 22, 2025 7:44 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
चश्मा लावण्याची गरजच राहणार नाही, दुधात मिक्स करून 'ही' पावडर खा, यासाठी किचनमधील 4 वस्तू आहेत आवश्यक!


