डॉक्टर महेश खरात यांच्या वडिलांचे 23 मे 2019 मध्ये कोरोना काळामध्ये निधन झालं होतं. त्यांचे वडील हे वारकरी संप्रदायातील होते. वडिलांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्त डॉक्टरांनी असा संकल्प केला की या पुढील प्रत्येक एकादशीला दवाखान्यात येणाऱ्या रुग्णांकडून एकही रुपया न घेता मोफत सेवा द्यायची. महेश खरात यांच्या पत्नी देखील वैद्यकीय अधिकारी असून त्या देखील या क्षेत्रात मोलाचे योगदान देत आहेत.
advertisement
दर एकादशीला सामान्य पेक्षा जास्त रुग्ण दवाखान्यात येतात. दवाखान्याची सर्वसामान्य ओपीडी ही 70 रुपये आहे. एकादशीच्या दिवशी साधारणपणे 30 ते 35 रुग्ण उपचार घेण्यासाठी येतात. या सर्व रुग्णांवर मोफत उपचार केले जातात. रामनगर इथे असलेल्या अंबिका हॉस्पिटलमध्ये डॉक्टर महेश खरात सेवा पुरवतात. गरजू व्यक्तींनी एकादशीला दवाखान्यात उपचारासाठी यावे आणि या मोफत सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन देखील डॉ. महेश खरात यांनी केले आहे.
समाजामध्ये अनेक जणांना सामाजिक दायित्व म्हणून समाज उपयोगी काम करण्याची इच्छा असते. या क्षेत्रात काम करणारे डॉक्टर, नर्सेस किंवा इतर लोक देखील या पद्धतीने संकल्प करून आपले सामाजिक दायित्व निभावू शकतात, असे महेश खरात यांनी लोकल 18 शी बोलताना सांगितले.
महेश खरात यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा सिंधी काळेगाव येथे झाले. सहावी ते दहावीपर्यंतचे शिक्षण शिवाजी हायस्कूल रामनगर येथे झाले. यानंतर महाविद्यालयीन शिक्षण जे.ई.एस. महाविद्यालय जालना येथे झाले. तर बी.ए.एम.एस.चे शिक्षण पुसद येथे झाले. त्यांच्या वडिलांनी त्यांना प्रत्येक अडचणीच्या काळात मदत केलीस, खंबीर पाठिंबा दिला. त्यामुळे त्यांच्या स्मरणार्थ आपण ही समाज उपयोगी काम करत असल्याचे डॉक्टर महेश खरात यांनी सांगितले.