TRENDING:

Fennel Seeds : बडिशेप आरोग्यासाठी वरदान, चव, सुगंधाबरोबरच आरोग्यासाठीही महत्त्वाची

Last Updated:

बडिशेप चवीसोबतच अनेक आरोग्यदायी फायद्यांसाठी ओळखली जाते. जेवणाची चव वाढवण्याबरोबरच पचन, वजन नियंत्रण, श्वासाची दुर्गंधी कमी करण्यासाठी बडिशेप  उपयुक्त आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : भारतीय स्वयंपाकघरात मिळणारे मसाले केवळ जेवणाची चवच वाढवत नाहीत तर आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहेत. बडिशेप हा त्यातलाच एक घटक..आपल्या घरात सहज उपलब्ध असणारी बडिशेप आरोग्यासाठी वरदान आहे, त्याचे फायदे जाणून घेतल्यावर तुम्ही दररोज खाण्यास सुरुवात कराल.
News18
News18
advertisement

बडिशेपेचा सुगंध आणि चवीमुळे जेवणाची रंगत वाढतेच पण पचनासाठीही बडिशेप उपयुक्त आहे. बडिशेप लोणची बनवण्यासाठी वापरली जाते. यासोबतच माऊथ फ्रेशनर म्हणूनही बडिशेपेचा वापर होतो. आयुर्वेदात बडीशेपेचा उपयोग औषध म्हणूनही केला जातो. बडीशेपेमध्ये कॅल्शियम, सोडियम, लोह आणि पोटॅशियम  हे घटक आढळतात, जे शरीराला अनेक आजारांपासून वाचवण्यास मदत करतात.

advertisement

Tomato Facial : घरच्या घरी करुन बघा टॉमेटो फेशियल, चेहऱ्याची त्वचा दिसेल तजेलदार

1. पोटदुखी कमी करण्यासाठी उपयुक्त:

पोटदुखीच्या वेळीही बडीशेप खाणं फायदेशीर मानलं जातं. बडिशेपेमुळे अपचन, सूज कमी होणं, आणि पचनशक्ती बळकट होण्यास मदत होते.

2. वजन कमी करण्यासाठी उपयुक्त:

बडीशेप वजन कमी करण्यासाठी उपयुक्त मानली जाते. यामध्ये आढळणारे फायबरचे गुणधर्म वजन नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. बडीशेप घालून केलेला चहा दररोज प्यायल्यानं वजन कमी होण्यास मदत होते.

advertisement

Vitamin A : 'व्हिटॅमिन ए' साठी हे पदार्थ नक्की खा, दूध, डोळे, त्वचा, हाडांसाठी गरजेचं

3. श्वासाची दुर्गंधी दूर करण्यासाठी:

बडिशेप माऊथ फ्रेशनर म्हणून वापरली जाते. श्वासाची दुर्गंधी यामुळे दूर केली जाऊ शकते. ज्यांना श्वासाच्या दुर्गंधीची समस्या आहे त्यांनी दिवसातून 3-4 वेळा बडीशेप चावावी. यामुळे दुर्गंधी कमी होऊ शकते.

advertisement

4. दृष्टीत सुधार:

बडिशेपेमध्ये व्हिटॅमिन ए गुणधर्म असतात ज्यामुळे दृष्टी सुधारण्यास मदत होते. दृष्टी सुधारण्यासोबतच बडिशेपेमुळे डोळ्यांची जळजळ कमी करण्यास देखील मदत होते.

5. अनियमित मासिक पाळी नियमित करण्यासाठी उपयुक्त:

बडिशेपेमध्ये जीवनसत्त्व, लोह आणि पोटॅशियमचे गुणधर्म आढळतात. यामुळे अनियमित मासिक पाळी नियमित करण्यात मदत होऊ शकते. बडिशेपेमुळे मासिक पाळीच्या वेदनांपासूनही आराम मिळतो.

advertisement

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Fennel Seeds : बडिशेप आरोग्यासाठी वरदान, चव, सुगंधाबरोबरच आरोग्यासाठीही महत्त्वाची
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल