उन्हाळ्यात चेहरा पिंपल्स आणि डागांमुळे खराब होत असेल, हे तीन सोपे घरगुती उपाय नक्की करून पहा. या उपायांमुळे चेहऱ्याच्या या समस्यांपासून आराम मिळू शकतो.
Summer Care : उन्हाळ्यात लवकर थकण्याची कारणं, थकवा घालवण्यासाठी हे उपाय लक्षात ठेवा
1. लिंबू आणि मधाचा फेस मास्क
साहित्य:
* 1 चमचा लिंबाचा रस
advertisement
* 1 चमचा मध
मध आणि लिंबाचा रस नीट मिसळा. हे मिश्रण चेहऱ्यावर लावा. ते 15-20 मिनिटं तसंच राहू द्या. यानंतर, थोड्या कोमट पाण्यानं चेहरा धुवा. लिंबात असलेलं सायट्रिक अॅसिड त्वचेवरील डाग हलके करण्यास मदत करतं, तर मधामुळे त्वचा मॉइश्चरायझ होते आणि चमकदार दिसते.आठवड्यातून 3 वेळा हे मिश्रण लावा.त्वचा खूप संवेदनशील असेल तर प्रथम पॅच टेस्ट करा आणि नंतरच मास्क लावा.
2. बटाट्याचा रस
एक छोटा बटाटा सोलून, किसून घ्या. बटाट्याचा रस कापसाच्या मदतीनं हा रस डाग असलेल्या भागांवर लावा. रस चेहऱ्यावर वीस मिनिटं राहू द्या आणि नंतर थंड पाण्यानं चेहरा धुवा. बटाट्यामध्ये असलेले एंजाइम आणि स्टार्च त्वचेचा रंग सुधारण्यासाठी आणि डाग हलके करण्यासाठी प्रभावी आहेत.
3. कोरफड जेल आणि हळद
1 चमचा कोरफड जेल, 1 चिमूटभर हळद मिसळून पेस्ट बनवा. झोपण्यापूर्वी ही पेस्ट चेहऱ्यावर लावा.रात्रभर ही पेस्ट चेहऱ्यावर राहू द्या आणि सकाळी कोमट पाण्यानं धुवा. कोरफडीमुळे त्वचा थंड होते आणि मॉइश्चरायझ राहते, तर हळदीमध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात, ज्यामुळे डाग हलके करण्यास मदत होते.त्वचा खूप संवेदनशील असेल तर प्रथम पॅच टेस्ट करा आणि मगच हे मिश्रण चेहऱ्यावर लावा.
Summer Care : उन्हाळ्यात खा दही आणि गूळ, पचनसंस्था होईल मजबूत
• उन्हात बाहेर जाताना नेहमी सनस्क्रीन वापरा. सूर्याच्या तीव्र किरणांमुळे त्वचेवरील डाग आणखी खोलवर होऊ शकतात.
• दररोज 8-10 ग्लास पाणी पिण्याची सवय लावा. या सवयीमुळे त्वचा हायड्रेटेड ठेवण्यास मदत करेल.
• आहारात फळं,हिरव्या भाज्या आवर्जून खा. त्यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स त्वचेला आतून पोषण देतात.
• आठवड्यातून एकदा स्क्रबिंग करावं, जेणेकरून मृत त्वचेच्या पेशी काढून टाकता येतील आणि नवीन त्वचा येईल.