घरगुती तेलासाठी लागणारं साहित्य -
तुम्हाला १/२ कप खोबरेल तेल, १/४ कप बदाम तेल, २ टेबलस्पून आवळा पावडर, २ टेबलस्पून शिकेकाई पावडर आणि १ टेबलस्पून लिंबाचा रस लागेल.
Cholesterol Management : खराब कोलेस्ट्रॉलवर नियंत्रणासाठी उपाय, आहारात करा बदल
तयार करण्याची पद्धत
एक कप भांड्यात खोबरेल तेल आणि बदामाचं तेल घालून मंद आचेवर चांगलं उकळून घ्या. नंतर त्यात आवळा पावडर आणि शिकेकाई पावडर मिसळा. आता 5 ते 7 मिनिटं उकळू द्या आणि गॅस बंद करा. आता मिश्रण थंड झाल्यावर त्यात लिंबाचा रस मिसळा. यानंतर हे तेल एका डब्यात ठेवा आणि केस धुण्यापूर्वी आठवड्यातून दोनदा केसांना या तेलानं मसाज करा.
advertisement
घरगुती तेलाचे फायदे
या तेलात लोह, लॉरिक ऍसिड, कॅप्रिलिक ऍसिड, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन के आणि स्क्वेलिन आढळतात. हे सर्व घटक तुमचे केस हायड्रेटेड आणि मऊ ठेवतात.
बदाम तेल
बदामाच्या तेलात जीवनसत्त्व ए आणि ई, फॅटी ऍसिडस्, प्रथिनं आणि पोटॅशियमसारखे पोषक घटक असतात. या सर्व घटकांमुळे केसांची मुळं मजबूत होतात, यामुळे केस गळणं कमी होतं आणि कोंड्याच्या समस्येपासून देखील आराम देतात.
Constipation: बद्धकोष्ठतेवर करुन बघा हा उपाय, पचनक्रियाही सुधारेल
आवळा पावडर
आवळा पावडरमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं, हा एक महत्त्वाचा पोषक घटक आहे. हे सर्व घटक त्यांच्या कोलेजन-बूस्टिंग गुणधर्मांसाठी ओळखले जातात. यामुळे केसांना खोल पोषण मिळतं.
शिकेकाई पावडर
शिकेकाई पावडरमध्ये असलेली जीवनसत्त्व ए, सी, डी आणि के कोलेजनचे उत्पादन वाढवतात, ज्यामुळे मुळांना पोषण मिळतं, केस मजबूत होतात आणि केसांची वाढ होते.
लिंबू
लिंबाच्या रसामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स आणि इतर पोषक घटक केस निरोगी आणि मुलायम ठेवण्यास मदत करतात. या नैसर्गिक तेलाचा नक्की वापर करा.