Cholesterol Management : खराब कोलेस्ट्रॉलवर नियंत्रणासाठी उपाय, आहारात करा बदल

Last Updated:

Cholesterol Control Tips: आपल्या शरीरात दोन प्रकारचे कोलेस्टेरॉल आढळतात. एक चांगले कोलेस्ट्रॉल आणि एक वाईट कोलेस्ट्रॉल. खराब कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण ठेवण्यासाठी आहारात बदल करणं गरजेचं आहे. 

News18
News18
मुंबई : कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवणं आपल्या शरीरासाठी आवश्यक आहे, याच्या जास्त प्रमाणामुळे अनेक आजार होऊ शकतात. कोलेस्ट्रॉल ही एक प्रकारची चरबी आहे, आपल्या शरीरात नैसर्गिकरित्या तयार होते. पेशींची दुरुस्ती आणि संप्रेरकांच्या निर्मितीमध्ये याची भूमिका महत्त्वाची आहे. आपल्या शरीरात दोन प्रकारचे कोलेस्ट्रॉल आढळतात. एक चांगलं कोलेस्ट्रॉल आणि एक वाईट कोलेस्ट्रॉल. खराब कोलेस्ट्रॉलच्या समस्येनं तुम्हीही त्रासला असाल तर आहारात काही बदल करणं गरजेचं आहे. हे अन्नघटक खराब कोलेस्ट्रॉल बाहेर काढण्यासाठी महत्त्वाचे आहेत. याचा आहारात समावेश केल्यानं कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहील. पाहूयात यातले महत्त्वाचे अन्न घटक
1. पालक
पालक ही हिरवी पालेभाजी, आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते. पालकात व्हिटॅमिन के आणि फोलेट हे घटक असतात. यामुळे रक्ताच्या गुठळ्या तयार होण्यास प्रतिबंध होते आणि रक्तवाहिन्या निरोगी राहतात.
2. भेंडी
भेंडीची भाजी साधारणपणे सर्वांनाच खायला आवडते. भेंडीमध्ये विरघळणारे फायबर भरपूर असते, यामुळे खराब कोलेस्ट्रॉल (LDL) कमी करण्यास मदत होते.
advertisement
3. गाजर
गाजर खाण्यानं कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते. गाजरांमध्ये बीटा-कॅरोटीन असते, जे कोलेस्टेरॉलचं ऑक्सिडेशन रोखते आणि रक्तवाहिन्या निरोगी ठेवते.
4. लसूण
लसूण हे स्वयंपाकघरातील महत्त्वाचा घटक, जो आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानला जातो. लसणामध्ये ॲलिसिन असतं, यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास आणि रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत होते.
advertisement
5. टोमॅटो
टोमॅटो जवळजवळ प्रत्येक घरात सर्रास वापरला जाणारा घटक. टोमॅटोमध्ये लाइकोपीन असते, जे कोलेस्टेरॉलचं ऑक्सिडेशन रोखतं आणि हृदयविकाराचा धोका कमी करतं.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Cholesterol Management : खराब कोलेस्ट्रॉलवर नियंत्रणासाठी उपाय, आहारात करा बदल
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement