1. 10-15 मिनिटं चाला -
रात्रीच्या जेवणानंतर लगेच बसणं किंवा झोपण्याऐवजी 10-15 मिनिटं सहज चालणं फायदेशीर ठरू शकतं. यामुळे पचन सुधारतं आणि शरीरातील कॅलरी बर्न करण्याच्या प्रक्रियेस गती मिळते. हलक्या चालण्यानंही रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते.
2. जास्त पाणी पिऊ नका -
रात्रीच्या जेवणानंतर जास्त पाणी पिणं टाळा, कारण त्यामुळे पचनक्रिया मंदावते. परंतु, कोमट पाणी पिणं फायदेशीर आहे, कारण यामुळे पचन सुधारतं आणि शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत होते.
advertisement
Radish : हिवाळ्यात ही भाजी आवर्जून खा, कॉलेस्ट्रॉल नियंत्रणासाठी उपयुक्त
3. मिठाई खाणं टाळा -
रात्रीच्या जेवणानंतर गोड खाण्याची सवय हे वजन वाढण्याचे मुख्य कारण बनू शकतं. तुम्हाला काही गोड खावंसं वाटत असेल तर तुम्ही फळाचा छोटा तुकडा किंवा गुळाचा तुकडा खाऊ शकता. यामुळे तुमची गोड खाण्याची इच्छा पूर्ण होईल आणि तुमचं वजनही नियंत्रणात राहील.
4. स्क्रीन वेळ मर्यादित करा -
रात्रीच्या जेवणानंतर मोबाईल किंवा टीव्ही पाहण्यात जास्त वेळ घालवल्यानं तुमचे शरीर निष्क्रिय होतं, ज्यामुळे वजन वाढू शकतं. त्याऐवजी एखादं पुस्तक वाचा किंवा ध्यान करा. यामुळे तणाव कमी होण्यासाठी आणि चांगली झोप येण्यासाठी मदत होईल.
Vitamin K : हाडं आणि रक्तासाठी आवश्यक व्हिटॅमिन के, पालक, अंडी खाण्यावर द्या भर
5. लवकर झोपण्याची सवय लावा -
रात्री उशिरा झोपल्यानं मिडनाइट स्नॅकिंगचा धोका वाढतो, ज्यामुळे वजन वाढू शकतं. रात्रीचं जेवण आणि झोपेमध्ये २-३ तास झोपण्याची सवय लावा. यामुळे तुमच्या झोपेची गुणवत्ता देखील सुधारेल.
7. ग्रीन टी किंवा हर्बल टी प्या -
रात्रीच्या जेवणानंतर ग्रीन टी किंवा हर्बल टी प्यायल्यानं चयापचय क्रिया गतिमान होते. त्यात अँटिऑक्सिडंट असतात, ज्यामुळे चरबी लवकर बर्न करण्यास मदत करतात.
8. अल्कोहोल आणि कॅफिन टाळा -
रात्रीच्या जेवणानंतर चहा, कॉफी किंवा अल्कोहोलचं सेवन टाळा. या पेयामुळे झोप आणि पचनावर परिणाम होतो. ज्यामुळे वजन कमी करण्याची प्रक्रिया मंद होऊ शकते.