नैसर्गिक तेल हे पारंपरिक पद्धतीने थेट बीयांपासून (जसे की शेंगदाणा, तीळ, सूर्यफूल) तेलघाणीत काढले जाते. या प्रक्रियेमध्ये कोणतीही रासायनिक प्रक्रिया किंवा उच्च तापमान वापरले जात नाही. त्यामुळे त्यातील पोषणमूल्य, जीवनसत्त्वे आणि नैसर्गिक चव टिकून राहते. याउलट, रिफाइंड तेल विविध रसायनांच्या साहाय्याने शुद्ध केले जाते. त्यात गंध काढण्यासाठी, रंग बदलण्यासाठी आणि टिकवण्यासाठी वेगवेगळ्या प्रक्रिया केल्या जातात, ज्या आरोग्यास हानिकारक ठरू शकतात, असं इंदानी यांनी सांगितले.
advertisement
Summer Recipe : बघताच तोंडाला सुटेल पाणी, चविष्ट अशी कैरीची चटणी, रेसिपीचा संपूर्ण Video
तेलात भेसळ झालेली आहे की नाही हे ओळखण्यासाठी संजय इंदानी यांनी सांगितले की, एक वाटीभर तेल घ्या आणि ते फ्रीजमध्ये 24 तास ठेवा. जर तेल शुद्ध असेल, तर ते फ्रीजमध्येही द्रव स्वरूपात राहील. मात्र जर त्यात भेसळ असेल तर ते तुपासारखे घट्ट होईल. हा साधा प्रयोग घरच्या घरी करता येऊ शकतो आणि भेसळयुक्त तेल टाळण्यासाठी उपयुक्त ठरतो.
आजकाल बाजारात दिसणाऱ्या आकर्षक पॅकिंग आणि ब्रँडेड नावांमागे खरी गुणवत्ता लपलेली असतेच असे नाही. रिफाइंड तेलात वापरल्या जाणाऱ्या रसायनांचा दीर्घकालीन परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. त्यामुळे शक्यतो नैसर्गिक तेलच वापरावे आणि स्थानिक उत्पादकांकडूनच तेल घेण्याचा सल्ला त्यांनी दिला.
आपल्या आहारातील तेलाचा योग्य प्रकार निवडणं हे केवळ चवच नाही तर आरोग्याच्याही दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या घरात वापरल्या जाणाऱ्या तेलाचा विचार करून योग्य पर्याय निवडावा, असंही त्यांनी सांगितलं.





