खोबरेल तेल केसांच्या वाढीसाठी उत्तम उपाय आहे, आणि याच तेलात मेथी आणि कढीपत्ता घालून केसांना लावणं आणखी उपयुक्त ठरतं. यामुळे केसांची वाढ होऊन केस दाट होतात. नारळाच्या तेलात फायदेशीर फॅटी ॲसिड असतात जे केस दाट होण्यास मदत करतात. सर्वप्रथम भांड्यात खोबरेल तेल गरम करा, त्यात कढीपत्ता आणि एक चमचा मेथी दाणे टाकून उकळा.
advertisement
Hair Growth : केसांच्या निरोगी वाढीसाठी फळांचा पर्याय, केस गळणं होईल बंद
तेल उकळल्यावर थंड होण्यासाठी बाजूला ठेवा. हे तेल केसांना लावायचं असेल तेव्हा ते थोडं गरम करा आणि नंतर ते मुळापासून टोकापर्यंत लावा आणि मसाज करा आणि एक ते दीड तासांनी केस धुवा.
Bloating : पोट फुगण्याच्या समस्येवर सोपा उपाय, पचन होईल सोपं, हे उपाय नक्की करुन पाहा
मेथीच्या दाण्यांमध्ये निकोटिनिक ॲसिड आणि प्रथिनं असतात. यामुळे केस मजबूत होतात, टाळूवरील त्वचेचं नुकसान कमी होतं आणि केसांची वाढ सुधारते. मेथीचे दाणे हेअर मास्क म्हणूनही लावू शकता. हेअर मास्क बनवण्यासाठी मेथी दाणे रात्रभर भिजत ठेवा आणि या बिया बारीक करून पेस्ट बनवा. ही पेस्ट केसांवर अर्धा तास ठेवल्यानंतर ती धुऊन काढा.
कढीपत्त्यात व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी आणि अनेक अँटी-ऑक्सिडंट्स आढळतात जे केसांसाठी फायदेशीर असतात. कढीपत्त्यामुळे टाळूवरील रक्ताभिसरण सुधारतं. यामुळे टाळूपासून केसांच्या टोकापर्यंत फायदा होतो. कढीपत्त्यामुळे केसांची वाढ तर होतेच पण केसांना चमकही मिळते.