बाहेरचं अन्न टाळा
डॉ. स्मिता सांगडे सांगतात की, पावसाळ्यात प्रामुख्याने पोटाचे विकार होण्याचं प्रमाण अधिक असतं. दूषित पाणी आणि रस्त्यावरचे अन्न खाल्ल्याने उलट्या, जुलाब, डोकेदुखी, ताप अशा समस्या उद्भवतात. त्यामुळे अशा आजारांपासून बचाव करण्यासाठी उकळून थंड केलेलं आणि स्वच्छ पाणी प्यावं. तसेच बाहेरचे अन्न शक्यतो टाळावं.
रोजच्या कामातून जिमसाठी वेळ नाही? वजन वाढीचं टेन्शन नको, घरीच करा हा वर्कआऊट!
advertisement
डोकेदुखी आणि उलट्यांपासून बचावासाठी अन्नपदार्थ स्वच्छतेच्या दृष्टीने सुरक्षित ठिकाणी तयार झालेलं असावं. खाण्यापूर्वी हात स्वच्छ धुणं गरजेचं आहे. विशेषतः लहान मुलं आणि वृद्ध यांना पावसाळ्यात विशेष काळजी घेणं गरजेचं आहे.
त्वचा विकारांचा धोका
पावसात भिजल्यावर ओले कपडे लवकरात लवकर बदलावेत. अंग कोरडं करावं, अन्यथा त्वचेचे आजार आणि स्किन इन्फेक्शन आणि डोकेदुखी होण्याची शक्यता असते. घराबाहेर जाताना छत्री किंवा रेनकोटचा वापर करावा आणि गरज असल्यास गरम कपडे परिधान करावेत.
झोप, व्यायाम गरजेचा
शरीराची प्रतिकारशक्ती टिकवण्यासाठी सकस आहार, भरपूर पाणी, वेळेवर झोप आणि व्यायाम करणे गरजच आहे. लक्षणं गंभीर वाटल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. पावसाळ्याचा आनंद लुटताना आरोग्याकडे दुर्लक्ष होणार नाही याची काळजी घेणं देखील तितकंच महत्वाचं आहे, असं डॉ. सांगडे सांगतात.