रोजच्या कामातून जिमसाठी वेळ नाही? वजन वाढीचं टेन्शन नको, घरीच करा हा वर्कआऊट!

Last Updated:

Health Care: सध्याच्या काळात कामाच्या धावपळीत व्यायाम आणि आरोग्याकडे दुर्लक्ष होते. तेव्हा घरच्या घरी व्यायाम करून आपण आपलं आरोग्य जपू शकता.

+
रोजच्या

रोजच्या कामातून जिमसाठी वेळ नाही? वजन वाढीचं टेन्शन नको, घरीच करा हा वर्कआऊट!

अहिल्यानगर: धावपळीच्या जीवनात तसेच बैठे कामामुळे आरोग्याचे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. वेळेअभावी प्रत्येकाला जिमला जाणं जमत नाही. त्यामुळे वजन वाढणं आणि वजन वाढल्यामुळे अनेक आरोग्याच्या समस्या निर्माण होणं हे नित्याचं झालं आहे. त्यासाठी जिमला न जाता घरच्या घरी काही वर्कआउट फॉलो करून वजन नियंत्रणात ठेवता येते. याबाबत अहिल्यानगर येथील फिटनेस मार्गदर्शक प्रियांका भालेराव यांच्याकडून जाणून घेऊ.
जिमला न जाता घरच्या घरी वर्कआउट करून सुद्धा आपण वजनावर नियंत्रण ठेवू शकतो. त्यासाठी दिवसभरात कोणत्याही वेळी स्वत:साठी थोडासा वेळ काढणं गरजेचं आहे. वजन कमी करण्यासाठी जिमलाच गेलं पाहिजे असं नाही. तुम्ही घरच्या घरी अर्धा तास वर्कआउट केला तरी पण वजनावर नियंत्रण ठेवता येतं.
advertisement
काही लोक दिवसभर जॉब करतात. त्यानंतर घरी आल्यावर पाहिजे तशी एनर्जी राहत नाही. त्यामुळे जिमला जायचे टाळाटाळ करतात. पण त्यामुळे अनेक समस्या निर्माण होतात. काही लोक वर्क फ्रॉम होम करतात. तेव्हा आरोग्यासाठी आपण घरच्या घरी काहीही पैसे खर्च न करता होम वर्कआउट करू शकतो. यामुळे जिमचा खर्चही वाजतो आणि आरोग्यही चांगले राहते. तसेच आपल्या वेळेनुसार आणि सोयीनुसार हा वर्कआउट करता येते.
advertisement
आरोग्यासाठी फायदेशीर
होम वर्कआउट करताना कशापासून सुरुवात करावी? हा प्रश्न अनेकांन असतो.  तर सुरुवातीला तुम्ही बेसिक योगा करू शकता त्यात सूर्यनमस्कार तसेच इतर आसने देखील करता येतील. पुढे हळूहळू त्यात वाढ करत तुम्ही इतर व्यायाम प्रकार करू शकता. तुम्ही दिवसभरातून 20 ते 30 मिनिटे व्यायाम केला तरी, तो तुमच्या शरीरावर असणारा ताण कमी करण्यास मदत करतो. हार्ट सर्क्युलेशन व्यवस्थित होते. हृदय निरोगी राहते आणि पैशाची बचत देखील होते.
advertisement
होम वर्कआउट कधीपासून सुरू करावा?
होम वर्कआउट सुरू करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं जे असतं मोटिवेशन. कारण जर आपण जिमला गेलो तर एका कोणत्यातरी दिवसापासून त्याची सुरुवात करतो. पण होम वर्कआउट करताना अनेकदा अडचण येते. आज करू नाहीतर उद्या करू असं अनेकांचं होतं. त्यामुळे होम वर्कआउट करताना मोटिवेशनची गरज असते, असे भालेराव सांगतात.
मराठी बातम्या/हेल्थ/
रोजच्या कामातून जिमसाठी वेळ नाही? वजन वाढीचं टेन्शन नको, घरीच करा हा वर्कआऊट!
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement