त्वचा चमकदार आणि केस मजबूत राहावेत यासाठी काही नैसर्गिक उपाय करुन पाहा. या उपायांमुळे उन्हाळ्यातही तुम्हाला ताजंतवानं वाटेल. उन्हाळ्यात धूळ आणि घाण आपल्या आरोग्यावर तसंच आपल्या त्वचेवर आणि केसांवर परिणाम करते. सूर्याच्या कडक किरणांसोबतच प्रदूषण आणि धुळीचे कण देखील आपली त्वचा आणि केस निर्जीव बनवतात. घामामुळे केस चिकट आणि निर्जीव दिसतात. तसंच चेहरा निस्तेज दिसतो. कधीकधी धूळ आणि घाण आपल्या डोळ्यांतही जाते. अशा वेळी डोळ्यांची विशेष काळजी घेणं आवश्यक आहे.
advertisement
Tanning : टॅनिंग घालवण्यासाठी खास टिप्स, घरी बनवलेले पॅक ठरतील उपयोगी
त्वचेची अशी घ्या काळजी
दररोज कोमट पाण्यानं चेहरा धुवा. बाहेर जाण्यापूर्वी सनस्क्रीन वापरा. त्वचेवर गुलाबपाणी, तांदळाचं पाणी किंवा कोरफडीच्या पाण्याचं टोनर वापरा. त्वचेला एक्सफोलिएट करा, जेणेकरून मृत त्वचेच्या पेशी निघून जातील आणि त्वचा चमकदार राहील. आहारात अँटिऑक्सिडंटयुक्त फळं आणि भाज्यांचा समावेश करा आणि पुरेसं पाणी प्या.
केसांची अशी काळजी घ्या
आठवड्यातून दोन ते तीन वेळा सौम्य शाम्पूनं केस धुवा आणि नंतर केसांना कंडिशनर लावा. विशेषतः केस कोरडे असतील तर केसांना हायड्रेट ठेवण्यासाठी नारळ तेल किंवा इतर तेल वापरा. आठवड्यातून एकदा हेअर मास्क लावा, दही, मध आणि कोरफडीचे जेल यांचं मिश्रणही यासाठी उपयुक्त आहे. महिन्यातून एकदा डीप कंडिशनिंग करा आणि नियमितपणे केस ट्रिम करा. शक्य तितकं पाणी प्या.
Ice Massage : चेहऱ्यावर बर्फानं करा मसाज, उन्हाळ्यात चेहरा ठेवा ठंडा ठंडा कुल कुल
धुळीपासून डोळ्यांचं रक्षण -
- डोळ्यात धूळ किंवा कोणताही कण गेला तर डोळे थंड पाण्यानं धुवा.
- डोळ्यांना आराम मिळावा म्हणून काही वेळ डोळ्यांत साधं पाणी शिंपडा.
- डोळ्यांमध्ये जळजळ होत असेल तर काही वेळ डोळ्यांवर आईस पॅड ठेवा.
- काही वेळ डोळे बंद ठेवा.
- डोळे थोडे शांत वाटले की मॉइश्चरायझिंग आय ड्रॉप्स लावू शकता.
- यानंतरही त्रास जास्त वाटला तर डॉक्टरांकडे जा.
या टिप्सचाही होईल उपयोग : आहारात प्रथिनं, जीवनसतत्वं आणि खनिजांचा समावेश करा, तब्येत चांगली राहावी यासाठी पुरेशी झोप घ्या.