कोल्हापूर : देशभरात होळी सण धुमधडाक्यात साजरा केला जात आहे. या होळी सणाच्या दुसऱ्या दिवसानंतर धुलीवंदन साजरी केली जाते. या सणात एकमेकांना रंग लावून हा सण साजरा करतात. होळीच्या खास प्रसंगी भांग पिण्याची परंपरा फार पूर्वीपासून चालत आलेली आहे. काही वैद्यकीय अहवालानुसार भांग पिणे हे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक असल्याचे सांगितले जातं. धुलीवंदनला किंवा महाशिवरात्रीला भांग पिण्याची परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून चालत आली आहे. भांग पिल्यानंतर त्याचा आपल्या आपल्या शरीरावर आणि मज्जासंस्थांवर नेमका काय परिणाम होतो? याबद्दलचं डॉक्टर अविनाश शिंदे यांनी माहिती दिली आहे.
advertisement
भारतात महाशिवरात्रीपासून होळीपर्यंत भांगचे सेवन केले जाते. काही काही लोक तर भगवान शिवाचा प्रसाद म्हणून भांगचे सेवन वर्षभर करत असतात. असे असले तरी शिवरात्रीपासून ते होळी-धुलीवंदनपर्यंत भांगचा वापर जरा जास्तच होतो. भांग अनेक प्रकारे सेवन केले जाते. जसे की, दुधात मिसळलेले, कचोरी बनवणे, लाडू बनवणे, आइस्क्रीम बनवणे भांगचे सेवन प्राचीन काळापासून केले जात आहे.
‘होळी लहान करा, पोळी दान करा’ सोलापुरात आगळावेगळा उपक्रम, video
कोणते घटक आढळतात?
भांगमध्ये टेट्राहायड्रोकानाबिनॉल किंवा टीएच आढळते. भांगच्या सेवनाने शरीरात डोपामाइन हार्मोनची पातळी वाढते. भांगचे सेवन केल्यानंतर भांगामधील घटक रक्ताद्वारे लगेच मनापर्यंत पोहोचतात आणि मनावरील तुमचे नियंत्रण कमी होऊ लागते. भांग पिल्यानंतर 2-3 तासांनंतर परिणाम होण्यास सुरुवात होते. भांगच्या सेवनामुळे मेंदू अतिक्रियाशील होतो आणि त्यामुळे तुम्हाला काही समजू शकत नाही कारण मेंदूवरचा ताबा तुम्ही गमावून बसलेले असता, असं डॉक्टर अविनाश शिंदे सांगतात.
भांग पिता आहात? तर त्याच्या दुष्परिणामांवर लक्ष द्या
जागतिक आरोग्य संघटनेनुसार, जगातील 2.5 टक्के लोक भांग वापरतात. ते सहज उपलब्ध होत असल्याने लोकांनी नशेत त्याचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. भांगमध्येही अनेक औषधी गुणधर्म देखील असतात. भांग अनेक शारीरिक समस्यांवर मात करण्यासाठीही उपयोगी ठरते.
भांग प्यायल्यावर त्याचा प्रभाव कोणत्याही नशेपेक्षाही जास्त काळ असतो. त्यामुळे भांग प्यायल्यावर होणारी नशा प्रत्येकासाठी वेगळी असू शकते. काहींना झोप येते तर काहींना विचित्र हालचाल आणि भास जाणवू लागतात. भांगेचा प्रभाव काहींना दुसऱ्या दिवसांपर्यंतही जाणवतो.
भांग प्यायल्यावर होणाऱ्या प्रभावामुळे बंदिस्त जागेची भीती वाटू लागते आणि विचित्र भास होऊ लागतात. हृदयाचे विकार, दम्याचा त्रास किंवा उच्च रक्तदाब असणाऱ्या व्यक्तींनी भांग कधीही पिऊ नये. कारण त्यामुळे तुमच्या पचनसंस्थेवर परिणाम होण्याची शक्यता होऊ शारीरिक त्रास वाढू शकतो. लहान मुलांना मोठ्या माणसांपेक्षा भांगेचा प्रभाव लवकर आणि जास्त होतो. तसेच गरोदर स्त्रियांनी भांग प्यायल्यास त्यांच्या गर्भावरही त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो, असंही डॉक्टर अविनाश शिंदे यांनी सांगतील.