‘होळी लहान करा, पोळी दान करा’ सोलापुरात आगळावेगळा उपक्रम, video
- Published by:Mohan Najan
- Reported by:Patel Irfan Hassan
Last Updated:
दुष्ट आणि वाईट प्रवृत्ती नष्ट करणारा म्हणून होळीचा सण साजरा केला जातो. उत्सवकाळात ‘होळी लहान करा, पोळी दान करा’ असा उपक्रम अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांच्यामार्फत करण्यात येत आहे.
इरफान पटेल, प्रतिनिधी
सोलापूर : दुष्ट आणि वाईट प्रवृत्ती नष्ट करणारा म्हणून होळीचा सण साजरा केला जातो. हा सण रंगांचा आणि सर्वांचा आनंद द्विगुणित करणारा असतो. त्यामुळे तो पर्यावरणपूरक साजरा करावा. उत्सवकाळात ‘होळी लहान करा, पोळी दान करा’ असा उपक्रम अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांच्यामार्फत करण्यात येत आहे. या संदर्भात अधिक माहिती अंनिस शहर शाखा कार्याध्यक्ष डॉ. अस्मिता बालगावकर यांनी लोकल 18 शी बोलताना दिली.
advertisement
होळीत पुरणपोळी टाकण्याऐवजी ती बाजूला काढून ठेवा, कोरडी राहील असे पाहा, एका कोरड्या खोक्यात, डब्यात गोळा करा. आणि गावातील कोणत्याही अंनिस कार्यकर्त्याला आणून द्या. त्या पोळ्या त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी गरीब वस्त्यांवर आणि आदिवासी वाड्यापाड्यांवर जाऊन कार्यकर्ते वाटप करतात. पोळी वाटणे हा उपक्रम कोणीही एखादी गरीब वस्ती निवडून त्यांच्या पातळीवर करू शकतो, असे आवाहन अंनिस शहर शाखा कार्याध्यक्ष डॉ. अस्मिता बालगावकर केले.
advertisement
आपली राष्ट्रीय संपत्ती आणि ऊर्जा साधने खूप मोठ्या प्रमाणात वाया जातात. इतकेच नव्हे तर त्यामुळे खूप मोठे वायू प्रदूषण होते. म्हणून आपण होळी अगदी छोटीशी आणि सुकी लाकडे व झाडांचा वाळलेला पाला पाचोळा वापरून करावी. होळीत नैवेद्य म्हणून पुरणपोळी टाकण्यापेक्षा गरिबीमुळे उपाशीपोटी जगणाऱ्यांना पुरणपोळी दान करणे जास्त हितकारक आहे.
advertisement
सोलापूरातील पुरणपोळी संकलन केंद्रे
पुणे नाका, गुरुकृपा जनरल स्टोअर जवळ, केंद्रप्रमुख लालनाथ चव्हाण 8767199550, सोलापूर रुग्णालयाच्या बाजूला, साई बाबा मंदिर समोर, केंद्र प्रमुख ब्रह्मानंद धडके 9860311171, विजापूर रोड इंदिरानगर, इंदिरा गांधी पुतळा जवळ, केंद्रप्रमुख शंकर खलसोडे 9028509481 अधिक माहितीसाठी व पुरणपोळी देण्यासाठी वरील केंद्र प्रमुखांना संपर्क करावा.
advertisement
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
March 13, 2025 2:29 PM IST