TOI च्या अहवालानुसार, आहार तज्ज्ञांच्या मते, दिवसा भात खाणे सर्वोत्तम आहे. विशेषतः दुपारच्या जेवणात भात खाण्याचा सल्ला दिला जातो. याचे मुख्य कारण म्हणजे दिवसा आपली चयापचय क्रिया जास्त असते, त्यामुळे भात सहज पचतो. रात्री भात खाणे टाळावे कारण या वेळी चयापचय क्रिया मंदावते, ज्यामुळे भात पचनाची गती कमी होऊ शकते. यामुळे वजन वाढणे, रक्तातील साखर वाढणे आणि इतर आरोग्य समस्यांचा धोका वाढू शकतो.
advertisement
भात खाण्याचे फायदे
- भात कार्बोहायड्रेट्सने भरपूर असतो, जो शरीराला त्वरित ऊर्जा देतो. यामुळे शारीरिक आणि मानसिक थकवा कमी होतो.
- भात हलका आणि सहज पचणारा आहार आहे. यामुळे पचनक्रिया निरोगी राहण्यास मदत होते. विशेषतः पांढरा भात खाणे अपचन किंवा जुलाब सारख्या पचन समस्यांमध्ये फायदेशीर ठरू शकते.
- भात ग्लूटेन-फ्री असतो, त्यामुळे ज्या लोकांना ग्लूटेनची ॲलर्जी आहे त्यांच्यासाठी तो योग्य आहे.
- ब्राउन राइसमध्ये फायबर आणि अँटिऑक्सिडंट्स भरपूर असतात, जे हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात.
- भातमध्ये सोडियमचे प्रमाण कमी असते, जे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते.
रात्री भात खाण्याचे तोटे
- रात्री भात खाल्ल्याने वजन वाढू शकते. कारण त्यात कॅलरीज जास्त आणि फायबर कमी असतात.
- रात्री भात खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते, जे मधुमेहाच्या रुग्णांसाठी हानिकारक ठरू शकते.
भात योग्य प्रकारे कसा खावा?
- भातासोबत भाज्या, डाळ किंवा प्रथिनयुक्त आहार घ्या.
- ब्राउन राइस खा कारण त्यात फायबर आणि पोषक तत्वे भरपूर असतात.
- भात तळणे किंवा जास्त मसालेदार बनवणे टाळा.
- भात खाण्याची सर्वोत्तम वेळ दुपारचे जेवण आहे.
योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात भात खाल्ल्याने तुमच्या आरोग्याला फायदा होऊ शकतो. मात्र, जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल किंवा मधुमेह सारखा आजार असेल, तर डॉक्टर किंवा आहारतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार भात खा.
हे ही वाचा : Tanning : टॅनिंग कमी करण्यासाठी घरी बनवता येईल स्क्रब, कोरडी त्वचा होईल मुलायम
हे ही वाचा : रोज रात्री खा 2 लवंग, सर्दी-खोकलाच नव्हे तर कित्येक आजार होतात दूर, एक्स्पर्टनी सांगितली खाण्याची योग्य पद्धत्त