हार्ट अटॅकची अनेक कारणं आहेत. पण ब्लड ग्रुपवरून हार्ट अटॅकचा धोका समजेल का? हार्ट अटॅक सामान्यतः कोणत्या रक्तगटाच्या व्यक्तींना येण्याची जास्त शक्यता असते, याबाबत संशोधन करण्यात आलं आहे.
2017 मध्ये युरोपियन सोसायटी आॅफ कार्डियोलॉजीने एक अभ्यास केला होता. यात 13 लाखांहून अधिक लोकांना समाविष्ट करून घेण्यात आलं होतं. संशोधकांनी ए आणि बी रक्तगटाची तुलना ओ रक्तगटाशी केली.
advertisement
Heart Attack : सर्वाधिक हार्ट अटॅक कधी येतो? वेळ, वार आणि महिना लक्षात ठेवा
संशोधनात दिसून आलं की,
ओ रक्तगट असलेल्या व्यक्तींच्या तुलनेत बी रक्तगट असलेल्या व्यक्तींना मायोकार्डीनल इन्फेक्शनचा धोका 15 टक्क्यांहून अधिक असतो.
तसंच ए रक्तगट असलेल्या व्यक्तींना ओ रक्तगट असलेल्या व्यक्तींच्या तुलनेत हार्ट फेल्युअर (हृदय क्रिया बंद पडणेचा धोका 11 टक्क्यांहून अधिक असतो. हार्ट फेल्युअर आणि हार्ट अटॅक हे दोन्ही हृदयविकाराचेच प्रकार आहेत. हार्ट फेल्युअर हे हळूहळू होतं तर हार्ट अटॅक अचानक येतो.
ओ ब्लड ग्रुप नसलेल्या व्यक्तींना हार्ट अटॅकसह अन्य हृदयरोगाचा धोका 9 टक्क्यांहून अधिक असतो.
ए आणि बी रक्तगट असलेल्या व्यक्तींमध्ये थ्रोम्बोसिस म्हणजेच रक्ताच्या गुठळ्या होण्याची शक्यता 44 टक्क्यांहून अधिक असते. रक्ताच्या गुठळ्या कोरोनरी धमन्या बंद करतात. यामुळे हृदयाच्या पेशींना होणारा ऑक्सिजन आणि पोषक घटकांचा पुरवठा बंद होतो. यामुळे हार्ट अटॅक येतो.
Heart Attack : शरीराच्या या भागातून घाम हृदयासाठी धोक्याची घंटा, येऊ शकतो हार्ट अटॅक
युरोपियन सोसायटी ऑफ कार्डिओलॉजीच्या माहितीनुसार, ओ रक्तगट असलेल्या व्यक्तींच्या तुलनेत अन्य रक्तगट असलेल्या व्यक्तींमध्ये हार्ट फेल होण्याची शक्यता जास्त असते, कारण त्यांच्यात रक्ताच्या गुठळ्या होण्याची शक्यता अधिक असते. ओ वगळता इतर रक्तगटाच्या व्यक्तींमध्ये नॉन-विलब्रॅण्ड फॅक्टर म्हणजे ब्लड कोटींग प्रोटीन प्रमाण अधिक असते. त्यामुळे ओ रक्तगट नसलेल्या व्यक्तींना हार्ट अटॅक येण्याची शक्यता अधिक असते.
आणखी एका संशोधनातही सारखाच दावा
अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या मेडीकल जर्नल्स आर्टेरियोस्क्लोरोसिस, थोम्ब्रोसिस आणि व्हस्क्युलर बायोलॉजीमध्येही असा एक अभ्यास प्रकाशित करण्यात आला आहे. त्यासुद्धा ज्यांचा रक्तगट ओ नाही आहे त्यांना हार्ट अटॅक येण्याची शक्यता जास्त असते, असाच दावा करण्यात आला आहे.
संशोधकांनी 4,00,000 हून अधिक लोकांवर संशोधन केलं आहे. या संशोधनातून ओ रक्तगट असणाऱ्या व्यक्तींच्या तुलनेत ए आणि बी रक्तगट असलेल्या व्यक्तींना हार्ट अटॅक येण्याची शक्यता 8 टक्क्यांहून अधिक असते, असं दिसून आलं.