सिल्व्हर प्लॅस्टिक सेंटर या दुकानामध्ये प्रीमियम दर्जाच्या प्लॅस्टिकच्या वस्तू मिळतात. स्वयंपाकघरात लागणाऱ्या विविध वस्तूंची येथे मोठ्या प्रमाणात खरेदी करता येते. गुणवत्तेच्या बाबतीत कोणतीही तडजोड न करता अत्यंत वाजवी दरात प्लॅस्टिक आणि स्टीलचे डबे, बाटल्या, कंटेनर, जार, बास्केट आणि डबल डेकर डब्यांचे पर्याय या दुकानात उपलब्ध आहेत.
advertisement
येथे केवळ 50 रुपयांपासून जेवणाचे डबे मिळतात. 100 रुपयांमध्ये 3 डबे, तर 400 रुपयांमध्ये 3 प्रीमियम डबे घेता येतात. मोठे कंटेनर आणि दर्जेदार प्लॅस्टिक बास्केट फक्त 100 रुपयांत मिळत आहेत. विविध आकारांमध्ये उपलब्ध असलेले मसाल्याचे डबे 150 रुपयांपासून, तर स्टीलचे डबे केवळ 200 रुपयांत विकले जात आहेत.
प्लॅस्टिकच्या बाटल्या देखील आकर्षक दरात उपलब्ध असून, लहान बाटली 50 रुपये आणि मोठी फक्त 60 रुपयांना मिळते. डबल डेकर डबे केवळ 80 रुपयांत, तर जास्त क्षमतेच्या जारची किंमत 150 ते 250 रुपयांदरम्यान आहे. प्रत्येक प्रकारच्या डब्यांमध्ये वेगवेगळ्या सहा ते सात साइजेस उपलब्ध आहेत, त्यामुळे गरजेनुसार निवड करणे सोपे जाते.
घरगुती वापरासाठी तसेच किचन मॅनेजमेंटसाठी उपयुक्त अशा या वस्तू टिकाऊ, सुंदर व किफायतशीर आहेत. बाजारात इतर ठिकाणी मिळणाऱ्या किंमतींच्या तुलनेत येथे या वस्तू खूपच स्वस्त मिळत असून दर्जाही प्रीमियम आहे. गृहिणींसाठी आणि हॉटेल व्यवसायिकांसाठी खरेदीची ही एक उत्तम संधी आहे. जर तुम्हालाही स्वस्तात चांगल्या दर्जाच्या प्लॅस्टिक वस्तूंची खरेदी करायची असेल तर क्रॉफर्ड मार्केटमधील हे दुकान उत्तम पर्याय ठरू शकतो.