दात घासायचे म्हणजे टूथपेस्ट हवी. यात रसायनांबरोबरच बहुतेकदा लवंग आणि मीठ वापरलेलं असतं. पण, अनेक टूथपेस्टमुळे पिवळेपणा दूर होत नाही. यासाठी नैसर्गिक टूथपेस्ट वापरणं हा चांगला पर्याय आहे, ही टूथपेस्ट तुम्ही घरी सहजपणे तयार करू शकता.
Menopause : रजोनिवृत्तीची चिंता करु नका, मानसिक व्यवस्थापनानं करता येईल मात
advertisement
ही नैसर्गिक टूथपेस्ट बनवण्यासाठी जांभळाच्या बिया आणि पानं उन्हात वाळवा आणि त्यांची बारीक पावडर बनवा. या मिश्रणात लवंग पावडर, त्रिफळा पावडर आणि खडे मीठ घाला. सर्व काही एका काचेच्या बाटलीत एकत्र ठेवा.
दररोज सकाळी बोटानं किंवा ब्रशनं दात आणि हिरड्यांना पावडर लावा. दोन मिनिटं मालिश करा, नंतर स्वच्छ धुवा. काही आठवड्यांत तुम्हाला त्याचे परिणाम दिसतील.
Belly Fat : तिशीनंतरच का वाढतो पोटाचा घेर ? शरीराच्या आत काय सुरु असतं ?
या पावडरनं दातांची चमक परत येईल शिवाय हिरड्यांना सूज आणि रक्तस्त्राव देखील कमी करेल.
घरगुती टूथपेस्टचे फायदे:
जांभळाच्या बियांमध्ये बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म असतात जे दातांना किडणे आणि संसर्गापासून वाचवण्यास मदत करतात, तर जांभळाच्या पानांमध्ये पिवळेपणा दूर करण्याची शक्ती असते. जर तुम्हाला पायरिया असेल तर ही पावडर लवकरच परिणाम दाखवेल. लवंग दातांना मुळांपासून मजबूत करेल आणि सैंधव मीठ देखील संसर्गाचा प्रसार रोखण्यास मदत करेल.
