TRENDING:

Cough Relief : जुनं ते सोनं, कफ सिरपच्या गोंधळात हे पारंपरिक उपाय ठरतील उपयुक्त, वाचा हेल्थ टिप्स

Last Updated:

कफ सिरप दुर्घटनेमुळे सर्दी आणि कफ सिरपबद्दल बऱ्याच गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. आयुर्वेदातल्या काही प्रभावी घरगुती उपचारांची उपयुक्तता यावेळी समजून घेणं जास्त गरजेचं आहे. इथे आपल्या रोजच्या वापरातल्या जिन्नसांचा प्रभावीपणे वापर कसा करावा समजून घेऊया. यामुळे सर्दी, खोकल्यापासून आराम मिळेल आणि रोगप्रतिकारक शक्तीही मजबूत होईल.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : सध्या देशात गाजतोय तो लहान मुलांच्या आरोग्याचा प्रश्न, कारण कफ सिरपमुळे झालेल्या लहानग्यांच्या मृत्यूमुळे देश हळहळला. कफ सिरप दुर्घटनेमुळे सर्दी आणि कफ सिरपबद्दल बऱ्याच गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे.
News18
News18
advertisement

देशभरातला पाऊस आता कमी होत आलाय आणि हवामान बदलतंय, अशा बदलणाऱ्या हवेत खोकला आणि सर्दी होण्याचं प्रमाण खूप वाढतं. खोकला आणि घसा खवखवत असेल तर सिरप घेण्याची शिफारस डॉक्टर करतात. घसा खवखवणं, नाक वाहणं, शिंका येणं आणि सतत खोकला हे सर्व शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम करतात.

कफ सिरप किंवा औषधांचा वापर करून आराम मिळतो, पण या औषधांमुळे झोपेची समस्या जाणवते किंवा  अनेकदा हे उपाय तात्कालिक ठरतात. सर्दी आणि खोकल्यापासून मुक्त होण्यासाठी नैसर्गिक आणि घरगुती उपाय शोधत असाल, तर ही माहिती पूर्ण वाचा.

advertisement

Cholesterol : ही हिरवी पानं करतील कॉलेस्ट्रॉल कमी, आहारात असा करा उपयोग

आयुर्वेदातल्या काही प्रभावी घरगुती उपचारांची उपयुक्तता यावेळी समजून घेणं जास्त गरजेचं आहे. इथे आपल्या रोजच्या वापरातल्या जिन्नसांचा प्रभावीपणे वापर कसा करावा समजून घेऊया. यामुळे सर्दी, खोकल्यापासून आराम मिळेल आणि रोगप्रतिकारक शक्तीही मजबूत होईल.

आलं आणि मधाचं मिश्रण - आल्यात दाहक-विरोधी गुणधर्म असतात आणि मधामुळे घशाला आराम मिळतो. एक चमचा आल्याचा रस घ्या आणि त्यात एक चमचा मध घाला. हे मिश्रण दिवसातून दोन-तीन वेळा घ्या. हे मिश्रण घसा खवखवणं आणि खोकल्याला लवकर आराम देऊ शकते.

advertisement

तुळस आणि काळी मिरी चहा - तुळशीत बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म असतात आणि काळी मिरी श्लेष्मा बाहेर काढण्यास मदत करते. तुळशीची पाच-सहा पानं घ्या, त्यात कुस्करलेल्या दोन तीन काळी मिरी कुटून घाला, एक कप पाण्यात उकळा, गाळून घ्या आणि गरम गरम प्या. या चहामुळे शरीर उबदार राहतं आणि सर्दीशी लढण्यास मदत होते.

advertisement

Cancer : चांगल्या सवयी करतील शरीराचं रक्षण, कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजारांना ठेवतील दूर

लसूण - लसणात अँटीव्हायरल आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात. लसूण पाकळी कच्ची चावा किंवा तुपात तळून खा. या उपायानं रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

मीठाच्या पाण्याच्या गुळण्या - घसा खवखवण्यासाठी हा एक जुना आणि प्रभावी उपाय आहे. एक ग्लास कोमट पाण्यात अर्धा चमचा मीठ मिसळा. दिवसातून दोन-तीन वेळा गुळण्या करा. यामुळे घसा साफ होतो आणि बॅक्टेरिया नष्ट होतात.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
महिलांनो व्यवसाय सुरू करायचाय? पुण्यात इथं मिळतंय मोफत मार्गदर्शन, Video
सर्व पहा

हळदीचं दूध - हळदीत अँटीसेप्टिक गुणधर्म असतात आणि दुधामुळे शरीर उबदार राहतं. सर्दी आणि खोकल्यापासून आराम मिळवण्यासाठी हळदीचं दूध प्या. अर्धा चमचा हळद एक ग्लास कोमट दुधात मिसळा. झोपण्यापूर्वी ते प्या. या उपायामुळे खोकला कमी होतो आणि झोप चांगली लागते.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Cough Relief : जुनं ते सोनं, कफ सिरपच्या गोंधळात हे पारंपरिक उपाय ठरतील उपयुक्त, वाचा हेल्थ टिप्स
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल