त्वचेसाठी नैसर्गिक स्क्रब आणि मॉईश्चरायझर घरातच उपलब्ध आहे. यासाठी आधीच्या पिढ्यांमधे केल्या जाणाऱ्या उपायाची आठवण. या उपायानं, त्वचा नैसर्गिकरित्या मॉइश्चराइझ आणि मुलायमही. आधीच्या काळी, साबण आणि क्रीम असे कोणतेही पर्याय उपलब्ध नव्हते, तेव्हा त्वचेसाठी मोहरीचा स्क्रब वापरला जात असे.
advertisement
मोहरीचा स्क्रब - मोहरीचा स्क्रब प्राचीन काळापासून वापरला जातोय. हा स्क्रब शरीरावर सुकताना मृत त्वचा काढून टाकली जाते आणि त्वचा स्वच्छ, मऊ आणि चमकदार दिसते. या स्क्रबबद्दल सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत.
मोहरीची पेस्ट बनवणं खूप सोपं आहे. मोहरी मंद आचेवर हलकी भाजून घ्या. नंतर, मिक्सरमधे किंवा खलबत्त्यात बारीक वाटून घ्या. या पावडरमधे थोडं मोहरीचं तेल घालून पेस्ट बनवा.
ही पेस्ट संपूर्ण शरीरावर लावा आणि काही मिनिटे हलक्या हातानं मसाज करा. पेस्ट सुकल्यावर अंघोळ करा.
मोहरी स्क्रबचे त्वचेसाठी फायदे - मोहरीच्या दाण्यांमधे व्हिटॅमिन ई, के आणि डी असतात, ज्यामुळे त्वचा आतून मजबूत होते. मोहरी स्क्रबमुळे त्वचेवर चमक येते आणि टॅनिंग कमी व्हायला मदत होते. मोहरीच्या पेस्टमधे बॅक्टेरियाविरोधी, बुरशीविरोधी आणि दाहशामक गुणधर्म असतात. यामुळे त्वचेचं संसर्गापासून रक्षण होतं.
