चेहरा स्वच्छ न करता झोपायला गेलात तर ही धूळ छिद्रांमधे शिरते. यामुळे मुरुमं आणि ब्लॅकहेड्स चेहऱ्यावर दिसायला सुरूवात होते. म्हणून, झोपण्यापूर्वी चेहरा धुण्यामुळे त्वचेला श्वास घेण्याची संधी मिळते. ही सोपी पायरी त्वचा निरोगी आणि चमकदार ठेवण्यासाठी खूप मदत करू शकते.
खूप जण यासाठी नाईट केअर रुटीन फॉलो करतात. चेहरा धुतल्यानंतर, सर्वात मोठा प्रश्न उद्भवतो तो म्हणजे चेहऱ्यावर काय लावावं. रात्री आपण झोपेत असताना आपली त्वचा दुरुस्त होत असते. झोपेत त्वचा स्वतःची दुरुस्ती आणि नूतनीकरण करत असते. यासाठी योग्य उत्पादनं वापरणं अधिक प्रभावी आहे.
advertisement
Sleep : चांगल्या झोपेसाठी सुपर उपाय, शांत झोप लागेल आणि गुणवत्ताही सुधारेल
1. मॉइश्चरायझर - त्वचा तेलकट असो किंवा कोरडी, मॉइश्चरायझर आवश्यक आहे. यामुळे त्वचा मॉइश्चरायझ होण्यास मदत होते आणि कोरडेपणा टाळता येतो.
2. कोरफड गर - नैसर्गिक घटक आवडत असतील तर कोरफडीचा गर हा सर्वात सोपा आणि प्रभावी पर्याय आहे. यामुळे त्वचेला आराम मिळतो, जळजळ आणि डागही यामुळे कमी होतात.
3. सीरम - व्हिटॅमिन सी, हायल्यूरॉनिक एसिड आणि नाईट सीरम असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. हे लावल्यानं त्वचेला चमक येते आणि वृद्धत्वाची लक्षणं म्हणजेच शरीरावरच्या बारीक रेषा आणि सुरकुत्या हळूहळू कमी होतात.
4. नाईट क्रीम - या सगळ्यांबरोबरच नाईट क्रीमही उपलब्ध असतात. यातले घटक रात्रभर त्वचेवर काम करतात आणि ती मऊ आणि चमकदार ठेवतात.
Castor Oil : त्वचेच्या समस्यांवर वापरा नैसर्गिक सीरम, या तेलानं त्वचा होईल मऊ
रात्री चेहरा स्वच्छ करून योग्य उत्पादनं लावल्यानं मिळणारे फायदे बघूया.
• छिद्रं स्वच्छ राहतात आणि मुरुम येण्याची शक्यता कमी होते.
• त्वचा मॉइश्चरायझ राहते, ज्यामुळे ती ताजी आणि निरोगी दिसते. नैसर्गिक दुरुस्तीची प्रक्रिया जलद होते.
• सकाळी चेहरा ताजा आणि चमकदार दिसतो.
स्किनकेअर ही वेळखाऊ प्रक्रिया वाटत असेल तर फक्त तीन सोप्या पायऱ्या लक्षात ठेवा: रात्री चांगल्या फेसवॉशनं चेहरा धुवा, त्वचेच्या प्रकारानुसार मॉइश्चरायझर किंवा अॅलोवेरा जेल लावा. हवं असेल तर आठवड्यातून दोन-तीन वेळा सीरम किंवा नाईट क्रीम वापरा, यामुळे चेहरा तजेलदार दिसेल.