टूथपेस्टचा अचूक फॉर्म्युला
हा सर्वात जुना आणि प्रभावी उपाय आहे. कोणताही पांढरा टूथपेस्ट थोड्या पाण्यासोबत मिसळून दागिन्यांवर लावा. जुन्या मऊ टूथब्रशने हळूहळू चोळा. टूथपेस्टमधील सूक्ष्म कण चांदीवरील काळा थर सहज काढून टाकतात. शेवटी स्वच्छ पाण्याने धुऊन मऊ कापडाने पुसून घ्या.
बेकिंग सोडा आणि अॅल्युमिनियम फॉइल
एका भांड्यात गरम पाणी घ्या आणि त्यात 2 चमचे बेकिंग सोडा मिसळा. भांड्याच्या तळाशी अॅल्युमिनियम फॉइल अंथरा. आता तुमचे दागिने या पाण्यात टाका. आयोनिक एक्सचेंज प्रक्रियेमुळे चांदीवरील काळेपणा लगेच फॉइलवर जाईल. 5 ते 10 मिनिटांनंतर दागिने बाहेर काढा आणि ते काचेसारखे चमकू लागतील.
advertisement
लिंबू आणि मीठाचे द्रावण
एका कप गरम पाण्यात अर्धं लिंबू पिळा आणि एक चमचा मीठ घाला. चांदीचे दागिने या मिश्रणात 15–20 मिनिटांसाठी भिजत ठेवा. लिंबातील सिट्रिक अॅसिड हट्टी काळेपणा दूर करतं. बाहेर काढल्यानंतर थंड पाण्याने धुवा.
टोमॅटो केचप
ऐकायला विचित्र वाटेल, पण केचप चांदी साफ करण्यासाठी खूपच उपयोगी आहे. तुमच्या दागिन्यांवर बारीक नक्षीकाम असेल, तर त्यावर थोडा केचप लावा आणि 15 मिनिटांसाठी तसंच ठेवा. केचपमधील अॅसिड ऑक्सिडेशन दूर करतं. मात्र तो जास्त वेळ ठेवू नका, अन्यथा चांदीची नैसर्गिक चमक कमी होऊ शकते.
कॉर्नस्टार्च आणि पाण्याची पेस्ट
जर तुमची चांदीची ज्वेलरी खूप जुनी आणि फारच मळलेली झाली असेल, तर कॉर्नस्टार्च (मक्याचं पीठ) आणि पाण्याची घट्ट पेस्ट तयार करा. ही पेस्ट दागिन्यांवर लावून पूर्णपणे वाळू द्या. वाळल्यानंतर खरबरीत टॉवेल किंवा मऊ ब्रशने चोळून स्वच्छ करा. यामुळे चांदीची हरवलेली चमक परत येते.
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
