घामाचा वास येत असल्यानं डिओड्रंट, परफ्युम, अत्तर लावत असाल तर आधी ही माहिती वाचा. कारण, घामाचा वास केवळ स्वच्छतेच्या अभावाचं लक्षण आहे की एखाद्या आजाराचं किंवा संसर्गाचं लक्षण देखील असू शकतं का याबद्दल अलिकडेच तज्ज्ञांनी यावर संशोधन केलं आहे.
विशेषतः महिलांसाठी, घामाचा वास हा अनेक आरोग्य समस्यांचं लक्षण असू शकतो. हा वास शरीरातील अंतर्गत समस्यांचे संकेत असू शकतो. यात हार्मोनल बदल, त्वचेला झालेला संसर्ग किंवा लैंगिक संक्रमित संसर्ग अशी कारणं असू शकतात.
advertisement
Sugar : लवकर म्हातारं व्हायचं असेल तर साखर खा, वाचा साखरेचे धोकादायक परिणाम
- जिवाणू किंवा बुरशीजन्य संसर्ग - शरीराचा घाम त्वचेवर असलेल्या जीवाणू किंवा बुरशीच्या संपर्कात येतो तेव्हा एक तीव्र आणि विचित्र वास येतो. हा वास सामान्य घामापेक्षा जास्त असेल आणि बराच काळ टिकत असेल तर ते त्वचेच्या संसर्गाचे लक्षण असू शकतं.
- लैंगिक संक्रमित संसर्ग - एका अभ्यासानुसार, गोनोरियासारख्या काही लैंगिक संक्रमित संसर्गांनी ग्रस्त असलेल्यांना शरीराच्या वासात बदल जाणवू शकतो.
- हार्मोनल असंतुलन - स्त्रियांमध्ये थायरॉईड समस्या किंवा मासिक पाळीच्या समस्या यासारख्या हार्मोनल बदलांचा देखील घामाच्या वासावर परिणाम होऊ शकतो. हायपरथायरॉईडीझम असलेल्या महिलांना जास्त घाम येऊ शकतो आणि त्याचा तीव्र वास येऊ शकतो.
- मधुमेह - घामाचा वास गोड किंवा फळांसारखा असेल, हे रक्तातील साखरेच्या असंतुलनाचं लक्षण असू शकतं. याला किटोन ब्रेथ म्हणतात. शरीरात इन्सुलिनच्या कमतरतेमुळे हा फरक जाणवतो.
Sweetener : चहातल्या साखरेला करा गुडबाय, साखरेऐवजी नैसर्गिक गोड पर्यायांचा करा वापर
यकृत किंवा मूत्रपिंडाच्या समस्या - घामाचा वास अमोनिया किंवा लघवीसारखा तीव्र असेल, तर ते यकृत किंवा मूत्रपिंडांच्या कार्यात बिघाड असल्याचे लक्षण असू शकतं. शरीर विषारी पदार्थ योग्यरित्या काढून टाकू शकत नाही, तेव्हा ते घामाद्वारे बाहेर पडतात.
अशी घ्या काळजी -
नियमित आंघोळ करा आणि स्वच्छता ठेवा.
संतुलित आहार घ्या आणि भरपूर पाणी प्या.
डिओड्रंट, परर्फ्युमनं वास कमी करण्याचा प्रयत्न करण्याऐवजी, त्याचं कारण शोधा.