पुरेशी झोप मिळाली नाही तर दुसऱ्या दिवशी थकवा किंवा अशक्तपणा जाणवू शकतो. दीर्घकाळ झोप न मिळाल्यानं आजार देखील होऊ शकतात. ही समस्या तुम्हालाही जाणवत असेल तर ही माहिती पूर्ण वाचा.
प्रसिद्ध एमबीबीएस, एमडी डॉ. शालिनी सिंग सोलंकी यांनी त्यांच्या इंस्टाग्राम हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत, डॉक्टरांनी अनिद्रेवर उपचार करण्यासाठी नैसर्गिकरित्या सेवन करता येतील अशा पाच गोष्टी सांगितल्या आहेत.
advertisement
Castor Oil : एरंडेल तेलाचे फायदे वाचा, त्वचा राहिल मुलायम, दिसेल सुंदर
अश्वगंधा - या यादीत अश्वगंधा पहिल्या क्रमांकावर आहे. अश्वगंधात असलेला अॅडाप्टोजेन हा घटक कॉर्टिसोल हे स्ट्रेस हार्मोन कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. मन शांत असतं आणि ताण कमी होतो तेव्हा झोप नैसर्गिकरित्या येते. झोपण्यापूर्वी कोमट दुधात थोडीशी अश्वगंधा पावडर मिसळून पिणं फायदेशीर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.
केशर - केशर चवीबरोबरच झोपेसाठी देखील उत्तम आहे. यातल्या घटकांमुळे सेरोटोनिन आणि डोपामाइन या हार्मोन्सचं संतुलन होतं. यामुळे मन शांत राहतं आणि झोपेची गुणवत्ता सुधारते. रात्री झोपण्यापूर्वी कोमट दुधात केशराचे दोन-तीन काड्या टाकून पिणं फायदेशीर आहे.
खसखस - खसखसमधे मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असतं. यामुळे स्नायूंना आराम मिळतो आणि मन शांत होतं. शरीर आणि मन दोन्हीही आरामशीर असतं तेव्हा झोप अधिक गाढ आणि शांत होते. यासाठी, रात्रीच्या जेवणानंतर एक चमचा भाजलेली खसखस खाऊ शकता.
Hair Loss : केस का गळतात ? केस वाढवण्यासाठी काय करायचं ? कोणती चाचणी आवश्यक ?
जायफळ - जायफळातील संयुगे सेरोटोनिन सोडतात, जे मनाला शांत करते आणि झोप येण्यास मदत करते. फक्त एक चिमूटभर जायफळ कोमट दुधात मिसळा आणि झोपण्यापूर्वी प्या.
कॅमोमाइल टी या नैसर्गिक हर्बल पेयामुळे मनाला आराम मिळतो. यामुळे ताण आणि चिंता कमी होते, ज्यामुळे झोप येणं सोपं होतं. झोपेच्या अर्धा तास आधी एक कप कॅमोमाइल चहा पिणं खूप फायदेशीर आहे.
झोपेचा त्रास होत असेल, तर औषधांवर अवलंबून राहण्यापूर्वी आहारात या कॅमोमाइल टी, जायफळ, खसखस, अश्वगंधा, केशर या पाच गोष्टींचा समावेश करण्याचा विचार करा. झोपेशी संबंधित समस्यांवर या नैसर्गिक पद्धतींचा वापर केल्यानं नक्की फरक जाणवेल.