TRENDING:

Rakshabandhan: यावर्षी भावाला बांधा हटके राखी, फक्त 300 रुपयांत स्वत: करा डिझाइन

Last Updated:

Rakshabandhan: आपण आपल्या लाडक्या भावासाठी सर्वात सुंदर आणि वेगळी राखी निवडण्याचा प्रयत्न करत असतो. मात्र, यंदा तुम्ही घरच्या घरी एक हटके राखी तयार करू शकता.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: रक्षाबंधनाचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. यंदा 9 ऑगस्ट (शनिवारी) रोजी संपूर्ण देशात बहीण-भावाच्या प्रेमाचा उत्सव साजरा होणार आहे. त्यामुळे विविध ठिकाणच्या बाजारपेठा देखील रंगीबेरंगी राख्यांनी सजल्या आहेत. बहीण-भावाच्या नात्याचं प्रतीक असलेली राखी आता विविध प्रकारात उपलब्ध आहेत. सध्या 'रेजिन आर्ट' नावाचा एक नवा ट्रेंड लोकप्रिय ठरत आहे.
advertisement

आपण आपल्या लाडक्या भावासाठी सर्वात सुंदर आणि वेगळी राखी निवडण्याचा प्रयत्न करत असतो. मात्र, यंदा तुम्ही घरच्या घरी एक हटके राखी तयार करू शकता. या राखीमध्ये तुम्ही भावाचं नाव देखील लिहू शकता तेही स्पेशल डिझाईन किंवा विशिष्ट आकारात. अशी राखी तयार करण्यासाठी 'रेजिन आर्ट' हे माध्यम उपयुक्त ठरू शकतं.

रेजिन आर्टचा वापर कसा करावा?

advertisement

रेजिन हे एक प्रकारचं क्लिअर केमिकल असते. त्याचा वापर करून आपण नाशवंत गोष्टी अधिक काळासाठी जतन करू शकतो. उदाहरणार्थ, आपल्या आवडत्या व्यक्तीने दिलेलं फुल रेजिनच्या मदतीने कित्येक वर्षे जपून ठेवता येऊ शकतं. राखी बनवण्यासाठी ही बाब उपयुक्त ठरू शकते. तुम्ही गुलाबाच्या पाकळीवर किंवा पानावर भावाचं नाव लिहून ते रेजिनमध्ये सील करू शकता. अशी राखी वर्षानुवर्षे टिकू शकते. अशा प्रकारच्या राखीत तुम्ही नाव, फोटो, लहान वस्तू, सुकवलेली फुलं किंवा आवडीच्या इतर वस्तू वापरू शकता.

advertisement

Raksha Bandhan 2025: सोशल मीडियावर धमाका, आता रक्षाबंधनाला लबूबू राखीची क्रेझ, फक्त 200 रुपयाला करा खरेदी

रेजिन राखी तयार करण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी:

रेजिन आणि हार्डनर (Epoxy Kit) - 150 रुपये

सिलिकॉन मोल्ड (राखी शेपसाठी) - 50 रुपये

ग्लिटर / ड्राय फ्लॉवर्स / अक्षरांची स्टिकर्स - 30 रुपये

राखीचा दोरा / सॅटिन रिबीन - 20 रुपये

advertisement

ड्रॉपर्स, स्टिक्स, हातमोजे इ. - 50 रुपये

रेजिन राखी कशी तयार कराल?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीन दर दबावातच, कांदा आणि मक्याची काय स्थिती? चेक करा एका क्लिकवर
सर्व पहा

रेजिन आणि हार्डनर दिलेल्या प्रमाणात मिक्स करा. तुमच्या आवडीचं डिझाईन असलेल्या मोल्डमध्ये नाव, फुलं, स्टिकर्स घालून त्यावर तयार केलेलं मिश्रण ओता. हे मिश्रण मोल्डमध्ये 12 ते 24 तास सेट होऊ द्या. सेट झाल्यावर रिबन लावा. अशा प्रकारे तुम्ही घरच्या घरी राखी तयार करू शकता.

advertisement

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Rakshabandhan: यावर्षी भावाला बांधा हटके राखी, फक्त 300 रुपयांत स्वत: करा डिझाइन
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल