TRENDING:

Lifestyle Tips : जपानी नागरिकांच्या दीर्घायुष्याचं रहस्य, सवयी बदला, आयुष्य बदलेल

Last Updated:

जपानी लोकांच्या दीर्घायुष्याचं आणि तरुण त्वचेचं रहस्य त्यांच्या संतुलित आणि निरोगी जीवनशैलीत आहे. लवकर उठणं, योग्य आहार घेणं, ध्यान करणं, निसर्गाच्या जवळ असणं आणि त्वचेची योग्य काळजी घेणं या सवयी त्यांना दीर्घकाळ तंदुरुस्त आणि तरुण ठेवतात. या सवयी तुमच्या दिनचर्येत समाविष्ट करू शकता.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : जपान हा सर्वात जास्त आयुष्यमान असलेल्या देशांपैकी एक आहे. ताणतणाव तर प्रत्येकाच्या आयुष्यात असतात पण मग ताण असूनही, जपानचे नागरिक याला कसे सामोरे जातात ? याच देशातले नागरिक दीर्घायुषी कसे ? 40-45 वर्षांच्या वयातही, जपानचे नागरिक 20-25 वर्षांच्या वयाचे दिसतात. याबद्दल संशोधनही झालं. जाणून घेऊया जपानी जीवनशैलीचं महत्त्व..
News18
News18
advertisement

जपानी नागरिकांच्या आरोग्याचं आणि तरुण दिसण्याचं रहस्य केवळ अनुवंशशास्त्रात नाही तर त्यांच्या काही दैनंदिन सवयींमधेही आहे. तरुण त्वचा आणि चांगलं आरोग्य मिळवण्यासाठी तुम्हीही दिनचर्येत काही सवयींचा बदल केला तर निरोगी आरोग्य जगता येईल.

सूर्याच्या पहिल्या किरणांसह दिवस सुरु करणं - या सवयीनं जपानी लोकांचा दिवस लवकर सुरू होतो. सकाळच्या सूर्यप्रकाशामुळे व्हिटॅमिन डी मिळतं, हाडे आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी हा घटक अत्यावश्यक आहे. शिवाय, निरोगी त्वचा आणि केसांच्या वाढीसाठीही हे जीवनसत्त्व महत्त्वाचं आहे. दिवसभर ऊर्जा राखण्यासाठी सूर्यप्रकाश आवश्यक आहे.

advertisement

Sleep Routine : झोप पूर्ण झाल्यावर पण थकवा का येतो ? जाणून घ्या कारणं, उपचार

ध्यान - दैनंदिन ध्यानधारणा हा जपानी संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहे. यामुळे ताण कमी करण्यास मदत होते आणि मन शांत होतं. ताण हे जलद वृद्धत्वाच्या लक्षणांचं सर्वात सामान्य कारण मानलं जातं.

सकाळी पाणी पिणं - जाग आली की पाणी पिणं ही जपानी सवय आहे. यामुळे विषारी पदार्थ बाहेर टाकले जातात, चयापचय सक्रिय राहतं आणि स्वच्छ आणि निरोगी त्वचेसाठी पाणी पिणं आवश्यक आहे.

advertisement

मॉर्निंग स्ट्रेचिंग (रेडिओ तैसो) - मॉर्निंग स्ट्रेचिंग किंवा रेडिओ तैसो व्यायाम संपूर्ण शरीराला सक्रिय करतात. यामुळे रक्ताभिसरण सुधारतं, स्नायूंना बळकटी मिळते आणि लवचिकता राखते.

हंगामी भाज्या - जपानी लोक हंगामी भाज्या खाण्याचा सल्ला देतात. यातली जीवनसत्त्वं, खनिजं आणि अँटिऑक्सिडंट्समुळे शरीराचं रोगांपासून संरक्षण होतं आणि त्वचेला नैसर्गिक चमक मिळते.

आंबवलेले पदार्थ - मिसो, नट्टो आणि लोणचे यांसारखे आंबवलेले पदार्थ जपानी आहाराचा भाग आहेत. यामुळे पचन सुधारतं, रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि मानसिक आरोग्यासाठी देखील फायदेशीर असतात.

advertisement

ग्रीन टी - ग्रीन टीमधे अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. यामुळे वृद्धत्वाची लक्षणं कमी करता येतात, हृदयाचं आरोग्य चांगलं राहतं आणि जळजळ कमी होते.

डबल क्लींजिंग आणि नैसर्गिक स्किनकेअर - जपानी नागरिक स्किनकेअरला खूप महत्त्व देतात. डबल क्लींजिंगमुळे त्वचा स्वच्छ आणि हायड्रेट राहते, तर फेशियल मसाजमुळे रक्ताभिसरण सुधारतं आणि त्वचा तरुण राहते.

advertisement

Breakfast : उत्तम आरोग्यासाठी महत्त्वाचं अन्न - न्याहारी, नाश्ता केला नाही तर शरीरात काय परिणाम होतात ?

इकिगाई आणि कृतज्ञता -  'इकिगाई' म्हणजे जीवनाचा उद्देश. जपानी लोक त्यांच्या नातेसंबंधांत आणि कामात आनंद शोधतात. शिवाय, कृतज्ञता व्यक्त करण्याची सवय त्यांना सकारात्मक आणि तणावमुक्त ठेवते, ज्याचा त्यांच्या आरोग्यावर देखील सकारात्मक परिणाम होतो.

जंगलात स्नान (शिनरीन-योकू) - या सर्वांव्यतिरिक्त, जपानचे लोक दररोज निसर्गात वेळ घालवण्यासाठी थोडा वेळ काढतात. यामुळे ताण कमी होतो आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. ताजी हवा आणि झाडांनी वेढलेला निसर्ग पाहिल्यानं मनःशांती मिळते.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
दिवाळीत करा घरीच बिझनेस, 30 रुपयांना घ्या अन् 50 ला विका! ठाण्यात इथं करा खरेदी
सर्व पहा

जपानी लोकांच्या दीर्घायुष्याचं आणि तरुण त्वचेचं रहस्य त्यांच्या संतुलित आणि निरोगी जीवनशैलीत आहे. लवकर उठणं, योग्य आहार घेणं, ध्यान करणं, निसर्गाच्या जवळ असणं आणि त्वचेची योग्य काळजी घेणं या सवयी त्यांना दीर्घकाळ तंदुरुस्त आणि तरुण ठेवतात. या सवयी तुमच्या दिनचर्येत समाविष्ट करू शकता.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Lifestyle Tips : जपानी नागरिकांच्या दीर्घायुष्याचं रहस्य, सवयी बदला, आयुष्य बदलेल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल