Breakfast : उत्तम आरोग्यासाठी महत्त्वाचं अन्न - न्याहारी, नाश्ता केला नाही तर शरीरात काय परिणाम होतात ?

Last Updated:

ब्रेक + फास्ट, ब्रेकफास्ट म्हणजे रात्रीच्या जेवणानंतरचा उपास सोडणं. दिवसभराची ऊर्जा मिळावी, शरीराला आवश्यक घटक मिळावे यासाठी न्याहारी महत्त्वाची. शरीराला वेळेवर अन्न मिळालं नाही तर कोणते परिणाम होऊ शकतात. जाणून घेऊया सविस्तर माहिती.

News18
News18
मुंबई : नाश्ता, न्याहारी म्हणजे दिवसाच्या सुरुवातीला ऊर्जा देणारा महत्त्वाचा पदार्थ. अनेक जण काही कारणांमुळे अनेकदा वेळेअभावी नाश्ता करत नाहीत. पण छोटीशी चूक आरोग्यावर, विशेषतः मेंदूवर मोठा परिणाम करू शकते हे अनेकांना माहित नसतं.
ब्रेक + फास्ट, ब्रेकफास्ट म्हणजे रात्रीच्या जेवणानंतरचा उपास सोडणं. दिवसभराची ऊर्जा मिळावी, शरीराला आवश्यक घटक मिळावे यासाठी न्याहारी महत्त्वाची. शरीराला वेळेवर अन्न मिळालं नाही तर कोणते परिणाम होऊ शकतात. जाणून घेऊया मेंदू - मज्जाविकार तज्ज्ञांनी दिलेली सविस्तर माहिती.
मायग्रेन आणि डोकेदुखीचा धोका - तुम्हाला आधीच मायग्रेनचा त्रास असेल तर नाश्ता न केल्यानं तो वाढू शकतो. न्यूरोलॉजिस्ट राहुल चावला यांनी यासंदर्भात एक व्हिडिओ शेअर केला आहे. जास्त वेळ उपाशी राहिल्यानं रक्तातील साखरेची पातळी कमी होऊ शकते, ज्यामुळे डोकेदुखी होऊ शकते.
advertisement
स्मरणशक्ती आणि लक्ष कमी होणं - नाश्ता केल्यानं आपल्या मेंदूला आवश्यक पोषण मिळतं. न्यूरोट्रांसमीटर  असलेल्या एसिटाइलकोलीन सारख्या घटकांना यामुळे उपयोग होतो. हा घटक शिकण्यासाठी आणि स्मरणशक्तीसाठी उपयुक्त आहे. नाश्ता न केल्यानं लक्ष विचलित होतं, काही गोष्टींवर योग्यरित्या लक्ष केंद्रित करू शकत नाही आणि काहीही लक्षात ठेवणं देखील कठीण होऊ शकतं.
advertisement
मनःस्थितीवर परिणाम-  रिकाम्या पोटी शरीरात कॉर्टिसोल हे तणाव संप्रेरक वाढतं. यामुळे राग, चिडचिड, चिंता किंवा मूड स्विंग होऊ शकतात.
मेंदूसाठी कमी ऊर्जा - मेंदूचं मुख्य इंधन आहे ग्लुकोज. ग्लुकोज आपल्याला अन्नातून मिळतं. सकाळी काहीही खाल्लं नाही तर रक्तातील साखरेची पातळी कमी होते. यामुळे थकवा जाणवतो, लक्ष केंद्रित करण्यात अडचण येते आणि मेंदूची प्रक्रिया मंदावते असंही डॉक्टरांनी या व्हिडिओत म्हटलं आहे.
advertisement
भूक - वजन कमी करण्यासाठी नाश्ता वगळत असाल तर डॉक्टरांनी सांगितलेला महत्त्वाचा सल्ला ऐका. नाश्ता वगळल्यानं नंतर जास्त भूक लागू शकते. त्यामुळे या बदल्यात, लोक अनेकदा तेलकट, साखरयुक्त किंवा जास्त कॅलरी असलेले पदार्थ खातात. यामुळे वजन वाढण्याचा आणि आरोग्य बिघडण्याचा धोका वाढतो.
advertisement
हे सगळं टाळण्यासाठी सकाळी नाश्ता नक्की करा. नाश्ता हलका आणि संतुलित असेल याकडे लक्ष द्या.
प्रथिनं - उदा- अंडी, मसूर किंवा दूध, फायबर - उदा - फळं किंवा संपूर्ण धान्यांपासून बनवलेले पदार्थ, आणि हेल्दी फॅटस् जसं की काजू किंवा बिया यांचा समावेश करा. यामुळे मेंदूला इंधन मिळतं आणि दिवसभर ऊर्जावान आणि लक्ष केंद्रित ठेवण्यासाठी मदत होते.
advertisement
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Breakfast : उत्तम आरोग्यासाठी महत्त्वाचं अन्न - न्याहारी, नाश्ता केला नाही तर शरीरात काय परिणाम होतात ?
Next Article
advertisement
Devendra Fadnavis: CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

View All
advertisement