व्हिटॅमिन बी 12 हा शरीरासाठीचा एक महत्त्वाचा पोषक घटक. यामुळे शरीराला ऊर्जा मिळते, मन तीक्ष्ण राहतं आणि लाल रक्तपेशी तयार करण्यास मदत होते. त्याच्या कमतरतेमुळे शरीरात थकवा, अशक्तपणा, मानसिक गोंधळ आणि मज्जासंस्थेच्या समस्या यासारख्या अनेक समस्या उद्भवू शकतात.
व्हिटॅमिन बी 12 साठी मांसाहार हा सामान्यतः सर्वोत्तम स्रोत मानला जातो. व्हिटॅमिन बी 12 साठी शाकाहारींना काही पदार्थ खाणं आवश्यक आहे. सफरचंद, केळ या फळांप्रमाणेच पनीर, दही आणि काही भाज्याही व्हिटॅमिन बी 12 चा चांगला स्रोत आहेत.
advertisement
Constipation : पोटाच्या विकारांवर हे उपाय करुन बघा, पोट होईल स्वच्छ, तुम्ही राहाल फ्रेश
सफरचंद - व्हिटॅमिन बी 12च्या कमतरतेवर मात करण्यासाठी, आहारात सफरचंदांचा समावेश करू शकता. सफरचंद नुसतं किंवा नाश्त्यात सॅलड म्हणून खाऊ शकता.
केळी - केळी हे जगात सर्वाधिक खाल्लं जाणारं फळ आहे. व्हिटॅमिन बी 12 मिळवण्यासाठी केळं खाऊ शकता. स्मूदी आणि शेकच्या स्वरूपात केळी खाऊ शकता.
मशरूम - आपल्या आहारात मशरूमचा समावेश केल्यानं व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता दूर होण्यास मदत होऊ शकते. भाज्यांमधे किंवा इतर अन्नपदार्थांत मशरुमचा वापर केला जाऊ शकतो.
दही - दह्यात व्हिटॅमिन बी 12 चांगल्या प्रमाणात असतं. जेवणात एक वाटी दह्याचा समावेश करू शकता.
पनीर - पनीर हा व्हिटॅमिन बी 12 चा एक चांगला शाकाहारी स्रोत आहे. त्यामुळे पनीर खाणं चांगलं. पनीरपासून भाज्या आणि विविध प्रकारचे पदार्थ बनवू शकता.
पालक - पालकात व्हिटॅमिन बी 12 असतं. तुमच्या आहारात रस, सूप आणि भाज्या अशा विविध प्रकारे समाविष्ट केलं जाऊ शकतं.