असा बदल जर तुम्हालाही जाणवत असेल तर ही माहिती नक्की पूर्ण वाचा. प्रसिद्ध योगगुरू हंसा योगेंद्र यांनी यावर एक सोपी युक्ती सांगितली आहे. यामुळे डोळे कोरडे होणं आणि डोळ्यांना खाज सुटणं यावर आराम मिळू शकेल.
Uric Acid : त्वचेवरही दिसतात युरिक अॅसिड वाढल्याची लक्षणं, या हेल्थ टिप्सचा होईल फायदा
advertisement
योगगुरूंच्या मते, जेव्हा आपण मोबाईल फोन किंवा लॅपटॉपसमोर असतो तेव्हा आपण कमी वेळा डोळे मिचकावतो. स्क्रीन वापरताना आपला डोळे मिचकावण्याचा दर अंदाजे 60% कमी होतो असं संशोधनातून समोर आलं आहे. याचा थेट परिणाम डोळ्यांमधील ओलाव्यावर होतो, ज्यामुळे ते कोरडे, लाल होतात आणि डोळ्यांना खाज सुटते. याकडे दुर्लक्ष करणं महागात जाऊ शकतं.
हे टाळण्यासाठी काही उपाय करता येतील. आपले डोळे निरोगी ठेवण्यासाठी आपण डोळे मिचकावण्याचे व्यायाम केले पाहिजेत. या व्यायामांनी डोळ्यांना नैसर्गिकरित्या आर्द्रता मिळते.
सॉफ्ट ब्लिंक - डोळे दोन सेकंदांसाठी बंद करा, नंतर हळूहळू उघडा. हे पाच वेळा करा.
स्क्विझ ब्लिंक - डोळे बंद करा आणि हलक्या दाबानं दोन सेकंद डोळे घट्ट बंद करा. नंतर ते हळूहळू उघडा. हे पाचवेळा करा.
High BP : ब्लड प्रेशरला सायलेंट किलर का म्हणतात ? रक्तदाब वाढला तर शरीरात नेमकं काय होतं ?
योगगुरूंच्या मते, हे दोन्ही व्यायाम डोळ्यांच्या पृष्ठभागावर एक संरक्षक तेलाचा थर तयार करतात. हा थर डोळ्यांना कोरडं होण्यापासून वाचवतो आणि ओलावा टिकवून ठेवतो.
आणखी काही टिप्सही उपयुक्त ठरू शकतात. दर वीस मिनिटांनी, स्क्रीनपासून दूर पहा आणि वीस सेकंदांसाठी दूर असलेल्या एखाद्या गोष्टीकडे पहा.
स्क्रीनचा ब्राइटनेस डोळ्यांना आरामदायी होईल अशा पातळीवर सेट करा.
शरीर आणि डोळे हायड्रेटेड राहण्यासाठी भरपूर पाणी प्या.
डोळे अजूनही जळजळत असतील किंवा जास्त कोरडे वाटत असतील तर डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.